Monday, November 18, 2024

Latest Posts

जरांगे पाटील आणि अब्दुल सत्तार यांची 3 तास बंद दाराआड चर्चा

| TOR News Network |

Manoj Jarange Patil Meet : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री अब्दुल सत्तार यांची ३ तास बंद दाराआड चर्चा झाली. (Abdul Sattar Meet Jarange Patil ) विशेष म्हणजे मध्यरात्रीपोसून तर पहाटे अडीच वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील आणि अब्दुल सत्तार यांची बैठक सुरु होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल भाष्य केले. तसेच गोरगरीब शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकारने करावं, अशी विनंतीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.

शिंदे गटाचे आमदार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. मनोज जरांगे पाटील यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यानंतर अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.(close door meeting between jarange patil and abdul sattar) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.(Jarange Patil Request to help Farmer) तसेच मराठा आरक्षणाचा विषय तात्काळ मार्गी लावावा, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढावा. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत, त्यांनी तातडीनं नुकसान भरपाई मिळावी, असेही मनोज जरांगे पाटील यांनी अब्दुल सत्तार यांना सांगितले.

यानंतर अब्दुल सत्तार यांनी या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन चर्चा केली. (Abdul Sattar Call DCM Fadnavis) तसचे यावर लवकरात लवकर तोडगा काढू, असे आश्वासनही अब्दुल सत्तार यांनी दिले. सरकारकडे आता केवळ 60 दिवस उरले आहेत. त्यामुळे आज मी स्वत: शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलणार आहे. तसेच आज कॅबिनेटमध्ये यावर चर्चा केली जाईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार हे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.

Latest Posts

Don't Miss