Sunday, January 12, 2025

Latest Posts

लवकर निर्णय घ्या : मारुतीच्या गाड्या महागणार

उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कंपनीने घेतला निर्णय

Maruti Suzuki Car Latest News : सर्व सामान्यांची आवडती कार म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मारुती सुझुकीने वाहनांच्या किंमती जानेवारीपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहेत. (Maruti Suzuki To Increase Car Prices From Jan 2024) तशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.त्यामुळे जर तुम्ही मारुतीची गाडी घेण्याचा विचार करत असाल तर लगेच काय तो निर्णय घ्या आणि मोठी बचत मिळवा.

देशातील सर्वाधिक खपाची मोटार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीने येत्या जानेवारीपासून मोटारींच्या किंमती वाढवत असल्याचे सोमवारी जाहीर केले. उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि वाढलेली महागाई यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.मारूती सुझुकीने या संबंधाने सोमवारी भांडवली बाजाराला माहिती दिली. कंपनीने किंमतीतील वाढ नेमकी किती असेल हे जाहीर केले नसले तरी, मॉडेलनुसार किमतीतील वाढ वेगवेगळी असेल, असे स्पष्ट केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, जानेवारी २०२४ पासून आमच्या मोटारींच्या किमतीत वाढ करण्याची योजना आखण्यात आली आहे. एकूणच वाढलेली महागाई आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातूनच किंमत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किमती फार वाढू नयेत, यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.मारूती सुझुकीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात १.९९ लाख मोटारींची विक्री केली.

छोट्या मोटारींची पुन्हा मागणी वाढेल

नागरिकांचे उत्पन्न वाढत असून, अर्थव्यवस्थेची वाढही वेगाने होत आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन वर्षांत छोट्या मोटारी परवडणाऱ्या दरात पुन्हा मिळू शकतील. मागील काही काळात छोट्या मोटारींची विक्री कमी झाली असून, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल अर्थात एसयूव्हींना ग्राहकांची सर्वाधिक पसंती दिसून येत आहे. तथापि पुढील काळात वाढत्या अर्थव्यवस्थेसह, वाढत्या आकांक्षांसह पुढे येणाऱ्या नव-मध्यमवर्गानुरूप छोट्या मोटारींना पुन्हा मागणी वाढेल, असा कंपनीचा अंदाज आहे.

Latest Posts

Don't Miss