Saturday, January 11, 2025

Latest Posts

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा दिला पॅलेस्टिन सरकारला थेट इशारा म्हणाले…

Israel and Hamas War Update: गेल्या ४४ दिवस दिवसांपासून इस्रायलकडून गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात हल्ले चालूच आहेत. आता तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पॅलेस्टिनमधील सरकारला थेट इशारा दिला आहे. हमासचा खात्मा केल्यानंतर इस्रायल गाझातील प्रशासनाला दहशतवादाला पाठिंबा देऊन देणार नाही, असं सुनावलं आहे. नेतान्याहू यांनी एक्स या सोशल मीडियावर एक व्हिडीओ निवेदन जारी करत भूमिका स्पष्ट केली आहे. (Israel Pm Netanyahu Warn Palestine Over Hamas Attack)

बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, मी हे अगदी स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही हमासचा खात्मा केल्यानंतर गाझात जे प्रशासन चालवत आहेत त्यांना आम्ही दहशतवादाला पाठिंबा देऊ देणार नाही. सध्या पॅलेस्टिनचं स्थानिक प्रशासन दहशतवादी कृत्य होत असल्याला नकार देतं, दहशतवाद्यांना पाठिंबा देतं, दहशतवाद्यांच्या मुलांना दहशतवादासाठी आणि इस्रायलला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशिक्षित करतं. आम्ही हमासचा पराभव केल्यानंतर गाझात हे होऊ देणार नाही,असा इशारा बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला आहे.पॅलेस्टिनचं परराष्ट्र खातं धक्कादायक दावे करत आहे. यात ते इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात हमासचा सहभाग नसल्याचा दावा करत आहेत. पॅलेस्टिनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांनीही इस्रायलवरील हल्ल्यात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केला आहे. युद्धाला ४४ दिवस झाले, तरीही पॅलेस्टिनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास (अबू माझेन) इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध करण्यास नकार देत आहेत. नरसंहार झाला नसल्याचा दावा करणारे अब्बास हमास-आयसिसने नरसंहार केला नसल्याचा दावा करत आहेत, असंही नेतान्याहू यांनी नमूद केलं.

Latest Posts

Don't Miss