Sunday, January 12, 2025

Latest Posts

हमासने आता आत्मसमर्पण करावं : Israel Hamas War Update

Israel Hamas War Latest Update: महिना होत आला तरी इस्रायलचे हमाच्या गाझावर हल्ले करणे सुरुच आहे. आता इस्रायलने गाझातील अल शिफा रुग्णालयाला टार्गेट केलं असून येथील विशिष्ट जागेवर ऑपरेशन राबवलं जात आहे. तसंच, हमासला आत्मसमर्पण करण्याचेही आवाहन इस्रायलकडून करण्यात आले आहे. (Israeli Army Warns And Says Hamas Must Surrender Now)

गेल्या दोन दिवसांपासून इस्रायलने गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयाला लक्ष्य केलं आहे. रुग्णालयात सर्वच वैद्यकीय सुविधांची वानवा निर्माण झाली असून रुग्णांचा जीव धोक्यात आलेला आहे. तर दुसरीकडे इस्रालयाने या रुग्णालयावर हल्ले सुरूच ठेवले आहेत. या रुग्णालयावरील हल्ल्यांना हमासने इस्रायल आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना जबाबदार धरल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. तसंच, पॅलेस्टाईन आरोग्यमंत्रालयानेही इस्रायलाच जबाबदार धरले आहे. येत्या काही तासांत अल शिफा रुग्णालयावर हल्ला करण्यात येणार आहे, असं एनक्लेव्हमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर तासाभरातच आयडीएफने हमासला आत्मसमर्पण करण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती गाझा आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.रुग्णालय आता धोक्याचे केंद्र बनले असल्याचंही सांगण्यात येतंय.इस्रायलने हमासविरोधात युद्ध पुकारल्यामुळे गाझामधील पॅलेस्टिनींना अन्न, पाणी आणि औषधे पोहोचवण्याच्या प्रयत्नांना इंधनाच्या तीव्र कमतरतेमुळे अडथळा निर्माण झाला आहे.दरम्यान, गाझा पट्टीवर नरसंहार सुरू असतानाही हे युद्ध गाझातील नागरिकांविरोधात नसून हमासविरोधात असल्याचं इस्रालयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Latest Posts

Don't Miss