Saturday, January 11, 2025

Latest Posts

इस्ररायलचे पंतप्रधान म्हणतात चिरडून टाका

Hamas Israel Latest News: इस्रायलकडून गाझापट्टीतील हमासवर मोठे हल्ले सुरुच आहेत.त्यामुळे तेथील नागरिक स्थलांतरीत होत आहेत. अशात आता इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू (Isrial Prime Minister Benjamin Netanyahu Order to Destroy Hamas ) यांनी सैनिकांना हमासला चिरडून टाका असा आदेश दिला आहे.

इस्रायलच्या फौजांकडून हमासवर मोठे हल्ले चढवल्या जात आहेत.इस्रायल जमिनीखाली बांधलेल्या भुयारी बांधकामांवर लक्ष केले आहे.त्या शिवाय पश्चिम किनारपट्टीमधील हमासच्या वरिष्ठ नेत्यांच्या घरे उध्वस्त करण्यात आल्याची माहिती आहे.युध्द सुरु झाल्यापासून जवळपास आठ लाख लोक स्थलांतरित झाले आहे.इस्रायलने सुरु केलेल्या हल्ल्यात हमासचे मोठे झाले असून काही रुग्णालये देखील लक्ष्य करण्यात आले आहे.लष्करी कारवाईसोबतच हवाई हल्ले देखील करण्यात येत आहे.नुकत्याच झालेल्या हल्ल्यात हाझातील जवळपास ३०० पेक्षा अधिक ठिकाण उध्वस्त करण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या सौनिकांकडून देण्यात आली आहे.युध्द सुरु झाल्यापासून ६ लाखांच्यावर नागरिकांनी संयुक्त राष्ट्राच्या शाळा आणि इतर अस्थापणांमध्ये आश्रय घेतला आहे.युध्दात हमासचे होणारे नुकसान आणि नागरिकांचे हाल बघता अमेरिकातील पॅलेस्टिनी नागरिकांनी गाझा पट्टीतील नागरिकांनसाठी निधी उभारत आहे.आता पर्यंत मोठ्या प्रमाणात निधी उभारला असला तरी हमासला इस्रायली सैनिकांचा वेढा असल्यामुळे तो निधी पोहचवायचा कसा हा देखील मोठा प्रश्न आहे.आता इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी हमासला चिरडून टाका व युध्द तीव्र करण्याचे आदेश सैनिकांना दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss