Monday, November 18, 2024

Latest Posts

हा निवडणूक आयोग आहे की भाजप आयोग

| TOR News Network | Aaditya Thackeray on Election Commission : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगासह भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे मुळशीमध्ये आले आहे. येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Aaditya thackeray slams bjp)

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगली आहे. सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते प्रचारासाठी कामाला लागलेत. प्रचारासाठी दोन दिवांपूर्वी ठाकरे गटाचं प्रचार गीत प्रदर्शित झालं. (Shivsena song for election) त्यामधील जय भवानी हा शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला नोटीस बजावण्यात आली आहे.(Take out the word jai bhawani) त्यावरून ठाकरे गट आक्रमक झाला असून आदित्य ठाकरेंनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही. हे निवडणूक आयोग आहे की भाजपा आयोग आहे हेच समजत नाहीये.(Is this election comission ?) देवेंद्र फडणवीस यांना स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी द्वेष आहे, असा आरोप देखील यावेळी आदित्य ठाकरेंनी केलाय. (Devendra fadnivis hate Balasaheb Thackeray)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद आहे. (Good response to mahavikas aghadi) शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हा विश्वास व्यक्त केलाय. एकनाथ शिंदे यांनी समोर येऊन बोलावं, मात्र ते येण्यास तयार नाहीत. तसेच राणे हे नेहमीच आमच्यावर बोलत असतात कारण त्यांना पगार मिळतो, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी राणेंवर देखील हल्लाबोल केलाय.(Rane get salary to talk on us)

निवडणूक आयोगाच्या या नोटीसवर उद्धव ठाकरेंनी देखील हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही देखील रामभक्त आहोत हनुमान भक्त आहोत. (We are also ram bhakt) आई तुळजा भवानी राज्याचं दैवत आहे. जय भवानी जय शिवाजी ही आपण घोषणा करतो. हे आम्ही बोलणारचं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कुलदैवतेबद्दल एवढा आकस आहे. ही हुकूमशाही आहे,(This is dictatorship)” असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत शब्द काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Latest Posts

Don't Miss