Saturday, January 18, 2025

Latest Posts

मिटकरी हे अजित दादांच्या बंगल्यावरील फोन ऑपरेटर आहेत का ?

| TOR News Network |

Bajrang Sonawane Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मराठवाड्यात भोपळा मिळाला आहे. (Zero seats in lok sabha to ajit pawar in marathwada) बीड लोकसभा निवडणुकीत बजरंग बाप्पा सोनावणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. (Bajrang Sonawane defeated pankaja munde) निवडणुकीनंतर बजरंग सोनवणे पुन्हा अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला.(Amol Mitkari big claim on bajrang bappa) त्यावर आता बीडचे बाप्पा सोनावणे यांनी मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. (Bajrang sonawane slams mitkari)

मला पदरात घ्या, असा फोन बजरंग सोनावणे यांनी अजित पवार यांना केल्याचा दावा मिटकरी यांनी केला होता. (Bajrang Sonawane Call to ajit pawar) त्यावर सोनावणे यांनी सणसणीत चपराक लगावली आहे. अमोल मिटकरी हे अजित दादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? (Bajrang Sonawane on mitkari) कोण आहेत अमोल मिटकरी? (Who is amol mitkari) असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केला. कारण ऑपरेटर कडेच फोनचे रेकॉर्ड असते, असा टोला ही त्यांनी लगावला.

माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेने खूप प्रेम केले आहे. माझ्या मनात जर काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलाने फोडेल. पवार साहेबांना सोडायचं म्हंटल्यावर माझे वडील मला कानसुलित मरतील.माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी परिस्थिती होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राजकारणाच्या पलिकडे काही विषय असतात, मात्र हे राजकारणावर का आणतात हे समजले नाही. कारखाना अडचणीत असेल किंवा चोर असेल तरी एवढा मोठा निर्णय घेणार नाही.ट्विट करण्याचा धनी किंवा त्याचा बोलविता धनी कोण आहे हे अमोल मिटकरी यांनी सांगावं, असे सोनावणे यांनी आवाहन केले.

विधानसभेत आमच्या 200 च्या वर जागा लागतील. आकडा सांगणे हे आमचा धंदा नाही.आमचं सरकार येणार म्हणजे येणार हे मी जबाबदारीने सांगतो. (Bajrang Sonawane on Vidhansabha) पक्ष जो माझ्यावर मराठवाड्यातील विधानसभेची जबाबदारी देईल तेवढं मी पार पाडेन. ऑपरेटरला उत्तर देणे हे खासदार म्हणून माझे काम नाही, असा टोला पण त्यांनी मिटकरी यांना हाणला.

Latest Posts

Don't Miss