IPL Mini Auction 2024 News: आयपीएल 2024 मिनी ऑक्शनला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी आयपीएल ऑक्शनला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये 333 खेळाडू आपलं नशीब आजमवणार आहेत. यापैकी 77 खेळाडूंचीच निवड होणार आहे.(IPL Mini Auction 2024 Expensive Players Fail In IPL This Year)
आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मंगळवारी 19 नोव्हेंबर रोजी ऑक्शन दुबईमध्ये पार पडणार आहे. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी खेळाडूंचा लिलावास सुरुवात होणार आहे. आयपीएलचे संघ 262 कोटी रुपये खेळाडूंवर उधळणार आहेत. परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास सर्वात महाग ठरणारे खेळाडू आयपीएलमध्ये यशस्वी झाले नाहीत.
सर्वात महाग खेळाडू अपयशी
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, 1 हजार 166 खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदणी केली होती.आयपीएल मिनी ऑक्सनसाठी यंदाही 15-16 कोटी रुपयांची बोली लागण्याची शक्यता आहे. यंदा दहा फ्रॅचायजींकडे 77 खेळाडूंचे स्लॉट रिकामे आहेत. यासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागणार आहे. आयपीएलमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला 2023 मध्ये पंजाब किंग्सने 18.5 कोटी रुपयांत घेतले होते. आयपीएलच्या इतिहासात सर्वात महाग बोली ही होती. परंतु सॅम अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. त्याने 14 सामन्यांत 276 धावा केल्या. गोलंदाजीत केवळ 10 विकेट घेतल्या. त्यासाठी सरासरी 10.76 धावा दिल्या.त्यामुळे यंदा त्याला पूर्वीचा दर मिळणार नाही अशी दाट शक्यता आहे.तर मागील ऑक्शनमध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स याला चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटींत घेतले. परंतु तो फक्त एकच सामना खेळू शकला. जखमी झाल्यामुळे पूर्ण हंगामात तो बाहेर होतो.त्यामुळे त्याला देखील मोठी रक्कम मिळणार नसल्याचे जाणकार सांगत आहे.तसेच दक्षिण आफ्रिकेचा क्रिस मौरिस याला 2021 च्या सीजनसाठी राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटीत घेतले होते. त्याने 15 विकेट घेतल्या तरी सरासरी 9.17 धावा दिल्या. तो केवळ 67 धावाच बनवू शकला.अशात त्याला देखाल कमी रकमेत खरेदी केल्या जाण्याची शक्यता असून गेल्या हंगामातील दिग्गज खेळाडू यंदा अपयशी ठरताना दिसून येत आहे.