Monday, January 13, 2025

Latest Posts

आयपीएलच्या लिलावासाठी हजारो खेळाडूंनी नोंदवली नावे : IPL Auction 2024

IPL Auction 2024 : आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबरला होणार आहे. या लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. (Total 1166 Players booked their Names For Participating in IPL 2024 Auction) यात ८३० खेळाडू भारतीय तर ३३६ परदेशी खेळाडूंची नावे आहेत. यामध्ये रचिन, रवींद्र आणि ट्रॅव्हिस हेड यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.

यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण २१२ कॅप्ड, ९०९ अनकॅप्ड आणि ४५ सहयोगी देशांचे खेळाडू आहेत. भारताच्या कॅप्ड खेळाडूंमध्ये वरुण आरोन, केएस भरत, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, मनीष पांडे, हर्षल पटेल, चेतन साकारिया, मनदीप सिंग, बरिंदर स्रान, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, हनुमा विहारी, संदीप वारियर आणि उमेश यादव यांच्या नावांचा समावेश आहे.

हे आहेत २ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू

हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजूर रहमान, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, जेराल्ड कोएत्झी, रिले रॉसौ, रॅसी व्हॅन डर डुसेन, अँजेलो मॅथ्यूज या खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी येवढी आहे.

१.५ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू

मोहम्मद नबी, मॉइसेस हेन्रिक्स, ख्रिस लिन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, डॅनियल वॉरॉल, टॉम कुरन, मर्चंट डी लँग, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान, टायमल मिल्स, फिल सॉल्ट, कोरी अँडरसन, कॉलिन मुनरो, जिमी नीशम, टीम साउदी, कॉलिन इंग्राम, वानिंदू हसरंगा, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड.

इतर देशांतील खेळाडूंची नावे

बांगलादेशकडून मोहम्मद शरीफुल इस्लाम, हसन महमूद, मेहदी मिराज, मुस्तफिजुर रहमान, महमुदुल्ला आणि तस्किन अहमद यांचा समावेश आहे. एकट्या मुस्तफिजूरची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. तसेच दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेचे खेळाडू आहेत.

Latest Posts

Don't Miss