Saturday, January 18, 2025

Latest Posts

आयपीएल : चेन्नई-बंगळूर मध्ये आज सलामी लढत

| TOR News Network | : देशभरात होळी पोर्णिमा आणि रंगपंचमी याचा उत्साह रंग भरू लागलेला असताना या उत्सवांच्या दोन दिवस अगोदरपासूनच आयपीएलची धुळवड सुरू होत आहे. (Ipl Starts From Today) एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना आयपीएलचा रोमांच आणि उत्साह मात्र पहिल्या सामन्यापासून टिपेला पोहोचणार, हे निश्चित. भारतीयांसाठी आयपीएल हा सर्वात मोठा क्रिकेटोत्सव.(IPL is the biggest cricket festival for Indians) १० संघ सत्तरच्या वर सामने, असा नेहमीचा फॉरमॅट असला, तरी लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलची दुसऱ्या टप्प्यातील इनिंग कधी सुरू होणार, हे निश्चित झालेले नाही; मात्र आजपासून पुढील १७ दिवसांत २१ सामन्यांची मेजवानी मिळणार आहे.(In Ipl next 17 days 21 Matches )

ऋतुराजच्या शिरावर मोठी जबाबदारी

चेन्नईचा संघ गतविजेतेपदाचा मुकुट परिधान करून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाशी दोन हात करायला मैदानात उतरत आहे. कर्णधार म्हणून धोनी माहात्म्याचा लौकिक सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या ऋतुराजच्या शिरावर लगेचच मोठी जबाबदारी आली असली, तरी संयमी आणि तेवढाच कणखर असलेला ऋतुराज गायकवाड हे आव्हान पेलण्यास सज्ज झाला आहे. (royal challengers bangalore vs chennai super kings)

चेन्नईने आयपीएलची पाच अजिंक्यपदे मिळवलेली आहेत; तर विराट कोहली प्रमुख चेहरा असलेल्या बंगळूर संघाचा वारंवार अपेक्षाभंग झालेला आहे. यंदा त्यांच्या महिला संघाने महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवल्याचे मानसिक पाठबळ मिळाले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर खेळणारा विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डुप्लेसी यांच्यावर बंगळूर संघाची मदार आहे.

राचिन रवींद्रवरची जबाबदारी वाढली

भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत कमालीची छाप पाडल्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेला राचिन रवींद्र चेन्नईसाठी हुकमी खेळाडू ठरू शकेल. त्याच्याच देशाचा डेव्हन कॉन्वे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्यामुळे राचिन रवींद्रवरची जबाबदारी वाढली आहे.

संघ : चेन्नई : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शैक रशीद, मिचेल सँटनर, सिरमजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महीश तीक्षाना, राचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रेहमान.

बंगळूर : फाफ डुप्लेसी (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत. दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅकस्, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयांक डागर, विजयकुमार वैशक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपले, हिमांक्शू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंग आणि सौरव चौहान.

Latest Posts

Don't Miss