Monday, November 18, 2024

Latest Posts

सावधान : समृद्धी महामार्गावर आता आयटीएमएस सिस्टम

| TOR News Network | Samruddhi Mahamarg Latest News : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून आजगयात त्यावर अनेक अपघात झाले आहेत. अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. या महामार्गावर वाहनांची गती अधिक असलेयाने अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता सरकारने ठोस पावले उचलले असून थेट दंडात्मक कारवाई होणार आहे. तसेच वेग मर्यादा नियंत्रीत ठेवण्यासाठी आयटीएमएस सिस्टम बसविण्यात येत आहे. (Penal action on Samruddhi Mahamarg)

समृद्धी महामार्गावर आता बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. महामार्गावर दर दहा किमीवर वाहनांचा वेग मोजणारं यंत्र बसविण्यात येणार आहे (Nagpur Mumbai Samruddhi Mahamarg). मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर वाहनांचा वेग मोजणारी यंत्रणा उभारली जात आहे.(Speedometers On Samruddhi Mahamarg)

यामुळे आता बेशिस्त वाहनचालकांना चाप बसण्यास मदत मिळणार आहे. भरधाव वाहनांवर दंडात्मक कारवाई करणं शक्य होणार  आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून यासाठी १ हजार ४९८ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. महामार्गावर इंटिलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) बसविण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे.

म्हणून गंभीर अपघात घडतात

समृद्धी महामार्गाची लांबी ७०१ किलोमीटर आहे. महामार्गावर फक्त २४ ठिकाणांवरून वाहनांना प्रवेश मिळणार आहे. या मार्गावर प्रतितास १५० किलोमीटर वेगमर्यादा आखून देण्यात आली (Samruddhi Mahamarg Accident) आहे. सद्य:स्थितीत या महामार्गावर प्रतितास १२० किलोमीटरची वेगमर्यादा आहे. परंतु, त्यापेक्षा अधिक वेगाने वाहने महामार्गावरू जाताना दिसतात. तसंच महामार्गावर लेनची शिस्त पाळली जात नसल्याचं दिसत आहे. यामुळं गंभीर अपघात घडले आहेत.

नियमभंग करणाऱ्यांवर होणार कारवाई

बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी आणि अपघातादरम्यान तत्काळ मदतीसाठी विशेष अशी आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येत आहे. आता नियमभंग करणाऱ्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करता येणार (Speed control system On Samruddhi Mahamarg) आहे. पुढील २१ महिन्यांत ही यंत्रणा उभारण्याचं काम पूर्ण केलं जाणार आहे. ‘आयटीएमएस प्रणालीसाठी मागविलेली निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे’,

Latest Posts

Don't Miss