Sunday, January 12, 2025

Latest Posts

Ratan Tata Thoughts : मी निर्णय घेतो आणि त्यानंतर त्याला योग्य ठरवतो

| TOR News Network |

Ratan Tata Latest News : उद्योगक्षेत्रातील चाणक्य आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजारपणामुळे निधन झाले. (Ratan Tata Dies) त्यांच्या मृत्यूमुळे भारताच्या उद्योगजगतात मोठी शोककळा पसरली आहे. जगभरातून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.  रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, त्यांचे उपचारादरम्यानच निधन झाले. रतन टाटा यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. मुंबई पोलिसांकडून पद्मविभूषण रतन टाटा यांना मानवंदना देण्यात आली आहे.रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे. सध्या त्यांचे पार्थिव राहत्या कोलाबा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

रतन टाटा हे स्वतःचे एक महान व्यक्तिमत्व होते, ज्यांनी नेहमी आपल्या साधेपणाने आणि आपल्या दयाळू वागण्याने लोकांची मने जिंकली. तो अनेकदा कोणत्या ना कोणत्या मार्गाने लोकांना शिकवताना दिसला. हे महान व्यक्तिमत्व आता आपल्यात नसले तरी त्यांची प्रेरणा आणि महान विचार सदैव आपल्यात राहतील. जाणून घ्या रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार.(Ratan Tata Thoughts)

लोखंडाला कोणी नष्ट करु शकत नाही. परंतु गंज लागल्यास लोखंड नष्ट होऊ शकतं. त्याचप्रमाणे कोणीही व्यक्तीला नष्ट करु शकत नाही. पण माणूस त्याच्या मानसिकतेमुळे नष्ट होऊ शकतो.

लोक तुमच्यावर जे दगड फेकतात, ते उचला. त्याचा उपयोग स्मारक बांधण्यासाठी करा.

माझा योग्य निर्णय घेण्यावर विश्वास नाहीय. मी निर्णय घेतो आणि त्यानंतर त्याला योग्य ठरवतो.

ज्या दिवशी मी उड्डाणासाठी सक्षम नसेन, तो माझ्यासाठी दु:खद दिवस असेल.

जीवनात चढ-उतार हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. कारण ईसीजीमध्ये सरळ रेषा येते, त्याचा अर्थ आपण जिवंत नाही असा होतो.

तुम्हाला वेगाच चालायच असेल, तर एकटे चाला. पण तुम्हाला दूरपर्यंत जायचं असेल, तर सोबत चाला.

पराभवाची भिती मनात नसणं हा जिंकण्याचा एकमेव मार्ग आहे.

प्रयत्न न करणं हे सर्वात मोठ अपयश आहे.

गोष्टी नशिबावर सोडायच्या यावर माझा विश्वास नाहीय. कठोर मेहनत आणि तयारीवर माझा विश्वास आहे.

आपलं मूळ कधी विसरु नका. जिथून तुम्ही आलात, नेहमी त्याचा अभिमान बाळगा

तुम्ही मुल्य आणि सिद्धांताशी कधी तडजोड करु नका. भले, तुम्हाला त्यासाठी कठीण रस्त्यावरुन चालाव लागेल.

तुम्हाला एक लढाई जिंकण्यासाठी एकापेक्षा जास्तवेळ लढावं लागू शकत.

Latest Posts

Don't Miss