Thursday, January 16, 2025

Latest Posts

पश्‍चिम इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक

11 जणांचा झाला मृत्यू : बचाव कार्य सुरु

Indonesia Marapi Volcano News: पश्‍चिम इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक होऊन 11 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक बचावकार्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे असून बचाव कार्य सुरु आहे. (11 people died in Indonesia Marapi volcano )

सुमात्रा बेटावरील माऊंट मारापीच्या नऊ हजार ४८४ फुटांवरील शिखरावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यातून तीन हजार मीटर उंच राखेचा लोळ आकाशात पसरला. या पर्वतावर शनिवारी (ता.२) ७५ गिर्यारोहक गेले होते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्यांची सुटका करण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. ४९ गिर्यारोहकांना खाली आणण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. बेपत्ता असलेल्या २६ जणांपैकी १४ गिर्यारोहकांचा शोध लागला आहे. त्यापैकी ११ जण मृतावस्थेत आढळले तर तीन जण जिवंत सापडले, असे पडंग शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख अब्दुल मलिक यांनी सांगितले. माऊंट मारापीवर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर गिर्यारोहकांना सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी बचाव पथक रात्रभर झटत होते, असे पश्‍चिम सुमात्राच्या नैसर्गिक स्रोत संवर्धन संघटनेने सांगितले. पश्चिम सुमात्रा आपत्ती निवारण संघटनेचे प्रमुख रुडी रिनाल्डी म्हणाले, ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या तप्त लाव्हारसामुळे काही गिर्यारोहकांना भाजले आहे. त्यांना खाली आणल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जे जखमी झाले आहेत, ते विवराच्या जवळ होते.

Latest Posts

Don't Miss