Sunday, January 12, 2025

Latest Posts

India Vs England: भारत विजयी षटकार मारणार का? इग्लंड समोर हे असणार तगडे आव्हान

India vs England: यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने प्रतिस्पर्धींचे दडपण समर्थपणे हाताळले आहे.स्पर्धेत आपला अपराजित विक्रम कायम ठेवला आहे.तर दुसरीकडे इग्लंड संघ जवळपास पॅक अपच्या दिशेने आहे.रविवारी होऊ घातलेल्या सामन्यात (Will India wins its sixth match in row) भारत विजयी षटकार मारणार का? तर इग्लंड समोर भारताचे कोणते खेळाडू डोके दुखी ठरणार. एकंदरीतच तगडे फलंदाज विरुध्द धारदार गोलंदाज असाच सामना रविवारी बघायला मिळणार आहे. 

हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भरतीय संघातील प्रत्येक खेळाडूंनी अपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली आहे.त्याचाच निकाल म्हणजे भारताने विश्वचषकातील प्रत्येक सामन्यात आपला विजय नोंदवला आहे.रविवारी लखनऊला होणाऱ्या भारत विरुध्द इग्लंडच्या (India vs England World cup 2023 Match) सामन्यात भारताचे पारडे जड आहे.भारताचे सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांची जोडी भारताला चांगली सुरुवात करुन देत आहे.विराट कोहली,इशान किशन,के.एल राहुल यांनी देखील झालेल्या सामन्यात आपली चमकदार कामगिरी केली आहे. 

फलंदाजी भारताचे बलस्थान असले तरी भारतीय गोलंदाजांनी प्रत्येक सामन्यात आपला जीव ओतला आहे.मोहम्मद शमी,बुमरा,कुलदीप यादव यांनी आक्रमक गोलंदाचे प्रदर्शन केले आहे.त्यामुळे इग्लंडला हा सामना जड जाण्याची शक्यता वर्तावली जात आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेरच असणार आहे.

एकंदरीत भारताकडे तगडे फलंदाज असले तरी इग्लंडकडे धारदार गोलंदाज आहेत. इग्लंडच्या संघाचे नेतृत्व जोस बटलर करत आहे.या संघात मोईन अली,सॅम करन,बेन स्ट्रोक्स,लियाम लिव्हिंगस्टोन सारखे अष्टपैलु खेळाडूंचा भरणा आहे.तर गोलंदाजीत रासी टोपली,डेविड विली मार्क वूड यांच्या सारखे भेदक गोलंदाज आहेत.असे असतानाही इग्लंडला चार सामन्यात हार पत्करावी लागली.त्यामुळे रविवारच्या सामन्यात कागदावर तगडा असलेल्या इग्लंडला आपला दम दाखवावा लागणार आहे.तर रोहित शर्मा,विराट कोहली, शुभमन गिल,हे इग्लंडसाठी डोके दुखी ठरणार आहेत.

इतिहास बदलवण्याची संधी 

विश्वचषकात भारत आणि इग्लंडचे ८ सामने झालेत.त्यात भारतीने ३ सामन्यात विजय मिळवता आला आहे.२००३ साली सौरभ गांगुलीच्या कर्णधारपदाखाली भारताने इग्लंडवर अखेरचा विजय मिळवल्याची नोंद आहे. भारताने विश्वचषकात इग्लंडवर २००३ मध्ये विजय मिळवला होता.तेव्हापासून भारत इग्लंडला पराभूत करु शकला नाही.हा २० वर्षापूवर्वीचा इतिहास बदलवण्याची संधी भारताला मिळाली आहे.यंदाच्या विश्वचषकात इग्लंडचा आत्मविश्वास खालवता असून भारताचे दडपण त्यांच्यावर असणार आहे.

Latest Posts

Don't Miss