Sunday, January 12, 2025

Latest Posts

ठरले तर मग, India Vs Australia फायनल

ऑस्ट्रेलियाने केले दक्षिण आफ्रिकेला पराभूत

Australia Vs South Africa Semi Final World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिके विरुध्द झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला ३ गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला.(Australia Beat South Africa in WC 2023 Semi Final Highlights) त्यामुळे आता १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान फायनल लढत होणार आहे. (In Cricket World Cup 2023 Final India and Australia will Fight to Hold the Cup)

दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेले २१३ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली.सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील अर्धशतकी खेळी साकारली. मात्र एडन मार्करमने वॉर्नर १८ चेंडूत २९ धावा करून त्रिफळाचीत केले. यावेळी ऑस्ट्रेलियाने ६० धावांवर १ गडीबाद अशी स्थिती होता. ऑस्ट्रेलियन संघाची दुसरी विकेट ६१ धावांवर पडली. मिचेल मार्श खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड मोठी फटकेबाजी करत ४८ चेंडूत ६२ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट १०७ धावांवर पडली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी अनेक झेल सोडले. महाराज-शम्सीच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज अडचणीत आल्याचे दिसून आले. तबरेझ शम्सीने मार्नस लाबुशेनला  आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. मॅक्सवेलने पाच चेंडूत एक धाव घेतली. आता जोस इंग्लिस स्टीव्ह स्मिथसोबत  क्रीजवर होता. २५ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या  १४१/५ होती. स्टीव्ह स्मिथ-जोश इंग्लिशने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला होता. ऑस्ट्रेलियाला १०० चेंडूत ३९ धावा हव्या असताना दक्षिण आफ्रिकेला पराभवाच्या छायेत दिसून आला.त्यानंतर  स्मिथला जेराल्ड कोएत्झीने झेल बाद केले. स्मिथने ६२ चेंडूत ३० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजय दिसत असला तरी दक्षिण आफ्रिकेने तो सहज मिळू दिला नाही. ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट १९३ धावांवर पडली. जोश इंग्लिश ४९ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. अखेर पॅट कमिन्स व मिचेल स्टार्कने संयमी पारी खेळत ४७. २ षटकात संघाला विजय मिळवून दिला.

त्तपूर्वी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार टेम्बा बावुमा पाठोपाठ क्विंटन डी कॉक बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला पॅट कमिन्सकरवी झेलबाद केले. त्याने १४ चेंडूत केवळ ३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट २२ धावांवर पडली. एडन मार्कराम २० चेंडूत १० धावा करून बाद झाला. त्यानंतर रॅसी व्हॅन डर डुसेन ३१ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर क्रीजवर होते. १२ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या २४/४  होती. १४ षटकांचा खेळ पूर्ण झाल्यावर पावसामुळे खेळ थांबला. खेळ सुरु होताच डेव्हिड मिलर आणि क्लासेन यांच्यात चांगली अर्धशतकी भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ ११९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. ट्रॅव्हिस हेडने हेनरिक क्लासेनला बाद करून ही भागीदारी तोडली. क्लासेनने ४८ चेंडूत ४७ धावा केल्या. मार्को जॅनसेन खाते न उघडताच बाद झाला.डेव्हिड मिलरने आपले अर्धशतक ७० चेंडूत पूर्ण केले आहे. दुसरीकडे मिलरने एक बाजू सांभाळत मोठी फटकेबाजी केली. एका बाजूने विकेट्स पडत असताना त्याने शानदार शतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्ये नजीक नेले. त्याने ११६ चेंडूत १०१ धावा करत नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेने ४९.४ षटकात  सर्वबाद २१२ धावा केल्या.

Latest Posts

Don't Miss