Saturday, January 18, 2025

Latest Posts

भारताच्या युवा खेळाडूंची परीक्षा (India Vs Australia)

India Australia Match Preview T20 2023: नुकताच ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय विश्वचषक उंचावल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. याच संघातील काही खेळाडू आजपासून सुरु होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेत सहभाग नोंदवणार असल्याने ऑस्ट्रेलियन संघ मजबूत दिसत आहे.तर भारताचे दिग्गज खेळाडू या मालिकेत नसणार आहेत. त्यांच्या जागी या मालिकेसाठी युवा खेळाडूंचा भरणा आहे. विश्वचषकाच्या भराभवाचा वचपा काढण्याची संधी युवा टीम इंडियाला मिळाला आहे. (Match Preview India Vs Australia 1st T20 Cricket Match At Visakhapatnam)

विशाखापट्टणम येथे आजपासून भारत ऑस्ट्रेलिया विरुध्द पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघा पूर्ण ताकदीने उतरणार आहे. विश्वचषकाच्या पराभवाला विसरणे सोपे नाही. मात्र, ट्वेन्टी-२० हे सूर्यकुमारचे आवडते प्रारूप असून तो या मालिकेत खेळण्यासाठी सज्ज असेल.युवा खेळाडूंना मालिकेत चांगली कामगिरी करत निवड समितीला आकर्षित करण्याची संधी आहे.

युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा आणि मुकेश कुमारसारख्या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. रिंकूने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात प्रभावित केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान पदार्पण करणाऱ्या जितेशला इशान किशनमुळे काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. भारताच्या या खेळाडूंनी आतापर्यंत वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तुलनेने कमकुवत आक्रमणाचा सामना केला आहे. भारताला ‘आयपीएल’पूर्वी ११ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहे. ‘आयपीएल’ स्पर्धेनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होईल. ऋतुराज गायकवाडसह जैस्वाल किंवा इशानपैकी कोणी एक जण डावाची सुरुवात करेल. सूर्यकुमार तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी फलंदाजी करू शकतो. भारताच्या ट्वेन्टी-२० संघात एकदिवसीय प्रारूपाच्या तुलनेने अनेक डावखुरे फलंदाज आहेत. अष्टपैलू अक्षर पटेल, यात शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांचाही समावेश आहे. गोलंदाजांमध्ये रवी बिश्नोईला अधिक सामने खेळण्यास मिळू शकतात. तसेच, वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार व अर्शदीप सिंग यांनाही चांगली संधी असेल.व्हीव्हीएस लक्ष्मण या मालिकेसाठी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे तर दुसरीकडे नुकताच ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय विश्वचषक उंचावल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. याच संघातील काही खेळाडू ट्वेन्टी-२० मालिकेत सहभाग नोंदवणार असल्याने ऑस्ट्रेलियन संघ मजबूत दिसत आहे. ट्वेन्टी-२० संघात ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, लेग स्पिनर अ‍ॅडम झ्ॉम्पा आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे. याशिवाय ‘आयपीएल’मध्ये चांगली कामगिरी करणारे मार्कस स्टोइनिस, नेथन एलिस, टिम डेव्हिडसारखे आक्रमक खेळाडू आहेत. संघात प्रमुख वेगवान गोलंदाज नसले तरीही, मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखालील संघ भक्कम दिसत आहे. त्यामुळे केन रिचर्डसन, एलिस, सीन अ‍ॅबट व जेसन बेहरनडॉर्फ यांच्या गोलंदाजीचा चांगला कस लागेल.

भारत (India): सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया (Australia): मॅथ्यू वेड (कर्णधार), आरोन हार्डी, जेसन बेहरनडोर्फ, सीन अ‍ॅबट, टिम डेव्हिड, नेथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झॅम्पा.

Latest Posts

Don't Miss