Monday, November 18, 2024

Latest Posts

भारतासाठी वानखेडेवरील पेपर सोपा की कठीण : India Vs New Zealand

उद्या New Zealand सोबत India चा पहिला उपांत्य सामना

India Vs New Zealand Semi Final 2023: क्रिकेटच्या चाहत्यांचा उत्साह आता शिगेला पोहचला आहे. बुधवारी (ता.15) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड संघाशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारत अंतिम फेरी गाठणार का हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. (World Cup 2023 Ind Vs Nz Semi Final Match Preview) होम पिचवर होणारा हा पेपर भारतासाठी सोपा की कठीण हे आपण जाणून घेणार आहोत.

आतापर्यंत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने एकही हार पत्कारली नाही.ही जरी भारतासाठी जमेची बाजू असली तरी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने क्रिकेच्या कोणत्याही सामन्यात विजयाची हमी देता येत नाही असे विधान पत्रकार परिषदेतून केले आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात भारताला गाफिल राहून चालणार नाही. भारतीय संघ गुणतालिकेत १८ गुणांसह अग्रस्थानी राहिला, तर न्यूझीलंड संघाने निर्णायक क्षणी आपली कामगिरी उंचावत उपांत्य सामन्यात स्थान मिळवले. विश्वचषकाच्या गेल्या दोन सत्रांतील उपविजेत्या न्यूूझीलंड संघाला कमी लेखण्याची चूक भारत करणार नाही. फलंदाजी व गोलंदाजी सर्वच आघाडय़ांवर संघाने चमक दाखवली आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या दहा जणांमध्ये भारताचे तीन फलंदाज आहे. भारताकडून विराट कोहलीने (५९४ धावा) सर्वाधिक धावा केल्या आहे. यासह कर्णधार रोहित शर्मा (५०३) व श्रेयस अय्यर (४२१) यांनी स्पर्धेत चुणूक दाखवली आहे. गोलंदाजी विभागातही भारतीय खेळाडूंनी छाप पाडली. जसप्रीत बुमरा (१७ बळी), रवींद्र जडेजा (१६ बळी), मोहम्मद शमी (१६ बळी) आणि कुलदीप यादव (१४ बळी) यांनी चमक दाखवली आहे.

न्यूझीलंडला कमी लेखून चालणार नाही

त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड समजले जात आहे. दुसरीकडे न्यूझीलंड संघाने चांगल्या सुरुवातीनंतर लय गमावली. मात्र, वेळीच कामगिरी उंचावत त्यांनी उपांत्य फेरीतील आपले निश्चित केले. केन विल्यम्सनही दुखापतीतून सावरला असून युवा रचिन रवींद्रने आपल्या कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधले. रचिन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ५६५ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. या निर्णायक सामन्यातही संघाला त्याच्याकडून अपेक्षा असतील.यासह संघाकडे चांगल्या अष्टपैलूंचा समावेश आहे. त्यामुळे भारताला न्यूझीलंडकडून चांगले आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss