Sunday, January 12, 2025

Latest Posts

भारताने इंग्लंडचा उडवला धुव्वा

| TOR News Network | Ind vs Eng 2nd Test Result 2024 : विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी धुव्वा उडवला. (India Won 2nd Test Vs England) त्याचबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. (India Second Test To Equal The Series) भारतीय संघाच्या या विजयात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांनी मोलाचे योगदान दिले. हैदराबादमध्ये झालेली पहिली कसोटी इंग्लंडने २८ धावांनी जिंकली होती.

भारताने पहिल्या डावात जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव २५३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला १४३ धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताने दुसऱ्या डावात शुबमनच्या शतकी खेळीमुळे २५५ धावा केल्या. त्याचबरोबर इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २९२ धावांवर आटोपला. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात झॅक क्रॉऊलीने सर्वाधिक ७३ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर पहिल्या डावातही त्याने ७६ धावांचे योगदान दिले होते.

कोहली नव्या विराट विक्रमाच्या उंबरठ्यावर

जसप्रीत बुमराहचे ९ बळी

jasprit bumrah test

जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी गोलंदाजीत कमाल केली. या सामन्यात त्याने ९ विकेट्स घेतल्या. बुमराहने पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. तर कुलदीपने एकूण ४ विकेट घेतल्या. रविचंद्रन अश्विन आणि मुकेश कुमारने ३-३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, रेहान अहमद आणि शोएब बशीर यांनी पहिल्या डावात प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. टॉम हार्टलेने दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या. रेहानने ३ आणि अँडरसनला २ विकेट्स मिळाल्या.

Latest Posts

Don't Miss