Thursday, January 16, 2025

Latest Posts

या करणांमुळे दोन भारतीय दिग्गज टेनिसपटूंनी पाकिस्तानात खेळण्यास दिला नकार

का घेतला सुमित नागल व ससीकुमार मुकुंदने हा निर्णय

Davis Cup Latest News :  टेनिसमध्ये सर्वात महत्वाची मानली जाणारी स्पर्धा डेव्हिस चषक यंदा पाकिस्तानात होत आहे.मात्र पाकिस्तानात जाऊन ही स्पर्धा खेळण्यास भारताच्या दोन दिग्गज टेनिसपटू सुमित नागल व ससीकुमार मुकुंदने चक्क नकार दिला आहे. (Why Tennis Players Sumit Nagal And Sasikumar Mukund Refused To Play David cup In Pakistan) त्यामुळे टेनिसच्या विश्वात खळबळ उडाली असून आता भारतासमोर संघनिवडीची समस्या निर्माण झाली आहे.कोणत्या कारणांमुळे दिला नकार? काय आहे प्रकरण?

भारताचे आघाडीचे टेनिसपटू सुमित नागल आणि ससीकुमार मुकुंद यांनी पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. मात्र खेळाडूंच्या या भूमिकेबाबत भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) नाराजी व्यक्त केली असून प्रशासकीय समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात येणार आहे.

रोहन बोपण्णाच्या डेव्हिस चषक निवृत्तीनंतर भारतीय संघ या स्पर्धेत प्रथमच एखादी लढत खेळणार आहे. विशेष म्हणजे ही जागतिक गट-१ मधील लढत आहे. त्यामुळे या लढतीला फार महत्त्व आहे. नागल हा पुरुष एकेरीतील भारताचा सध्याचा सर्वोत्तम टेनिसपटू असून तो एटीपी क्रमवारीत १४१व्या स्थानी आहे. मुकुंद हा ४७७ व्या स्थानावर असून तो क्रमवारीनुसार एकेरीतील भारताचा दुसरा सर्वोत्तम टेनिसपटू आहे.

 यापूर्वी दोन वेळा दिला होता नकार

नागल आणि मुकुंद या दोघांनीही या लढतीसाठी आपली अनुपलब्धता ‘एआयटीए’ला कळवली आहे. मात्र, त्यांनी या निर्णयामागील कारण स्पष्ट केलेले नाही; परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी या लढतीत न खेळण्यामागे पाकिस्तानात जावे लागणे हा मुद्दाच नसल्याचे समजते. ‘‘पाकिस्तानने ही लढत हिरवळीवर (ग्रास कोर्ट) खेळविण्याचा निर्णय घेतला, त्या वेळीच आपण या लढतीत खेळण्यास उत्सुक नसल्याचे सुमितने संघ व्यवस्थापनाला कळवले होते. तर मुकुंदने वैयक्तिक कारणाने ही लढत खेळण्यास नकार दिला आहे,’’ अशी माहिती ‘एआयटीए’च्या सूत्रांकडून देण्यात आली. आम्ही हा विषय आता प्रशासकीय समितीसमोर ठेवणार आहोत. खेळाडू आजारी किंवा दुखापतग्रस्त असेल, तर समजून घेता येते. मात्र, येथे काहीच ठोस कारण नाही. मुकुंदने तर यापूर्वी दोन वेळा देशासाठी खेळण्यास ऐन वेळी नकार दिला आहे,’’ अशी प्रतिक्रिया ‘एआयटीए’चे सचिव अनिल धुपर यांनी व्यक्त केली.

Latest Posts

Don't Miss