Saturday, January 18, 2025

Latest Posts

स्मृती, रिचा, जेमिमा, दीप्तीची चमकदार कामगिरी

भारताची पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी

IND vs AUS Womens’s Test Match Updates : ऑस्ट्रेलियन संघाला २१९ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी घेतली आहे. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात ३७६ धावा केल्या होत्या. सध्या पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा क्रीजवर आहेत. (Indian Womens Team Took 157 Run Lead At Second Day Of The Test Match Against Australia) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये एकमेव कसोटी खेळली जात आहे.

भारताचा पहिला डाव

शफाली वर्मा ४० आणि स्मृती मंधाना ७४ धावा करून बाद झाल्या. त्यानंतर स्नेह राणाला नऊ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनर आणि जेस जोनासेन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. यानंतर रिचा घोष आणि जेमिमा यांनी चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी किम गर्थने तोडली. तिने रिचाला बाद केले. रिचा १०४ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाली.

त्याचवेळी जेमिमानेही (७३) आपले अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार हरमनप्रीत कौर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली, तर यास्तिका भाटियाला केवळ एक धाव करता आली. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स १२१ चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने ७३ धावा करून बाद झाली. तिला ऍशले गार्डनरने सदरलँडच्या हाती झेलबाद केले. यानंतर दीप्ती आणि पूजाने पुन्हा आठव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. दीप्ती ७० धावा करून आणि पूजा ३३ धावा करून क्रीजवर आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ धावांवर आटोपला. बेथ मूनीने ४०, ताहिला मॅकग्राने ५० आणि कर्णधार अॅलिसा हिलीने ३८ धावा केल्या. याशिवाय किम गर्थ २८ धावा करून नाबाद राहिली. सदरलँड (१६), जोनासेन (१९) आणि लॉरेन चीटल सहा आणि अलाना किंग पाच धावा केल्यानंतर बाद झाले. फोबी लिचफिल्डला खातेही उघडता आले नाही, तर एलिस पेरी चार धावा करून बाद झाली. भारताकडून पूजा वस्त्राकरने चार विकेट घेतल्या. तर स्नेह राणाने तीन गडी बाद केले. दीप्ती शर्माने दोन गडी बाद केले.

 

Latest Posts

Don't Miss