Saturday, January 11, 2025

Latest Posts

सिंदखेड राजात पवारांची नवी खेळी : शिंगणे विरुध्द शिंगणे रंगणार सामना

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : लोकसभेत बारामती मध्ये पवार विरुध्द पवार असा सामना झाला होता. त्यात शरद पवार यांना बारामती राखण्यात यश आले. आता पुढे विधानसभा आहे. त्यातच अजित पवार आणि शरद पवार आपल्या उमेदवाराच्या शोधात आहेत. अशातच आता सिंदखेड राजा विधानसभा क्षेत्रातून शिंगणे विरुध्द शिंगणे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. (In Sindkhed Raja Shingne VS Shingne) गेल्या 25 वर्षांपासून डॉ. राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येत आहेत. मात्र ते आता अजित पवार गटात आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे (Gayatri Shingne to Contest From Sindkhed Raja) शरज पवार गटाकडून त्यांच्या विरोधात उभी ठाकली आहे. त्यामुळे गायत्री शिंगणे विरोधात आमदार राजेंद्र शिंगणे असे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे.(Rajendra Shingne Vs Rajendra Shingne)

डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात प्रवेश केल्याने सिंदखेडराजा मतदारसंघाचे राजकीय समिकरणे बदलली आहेत. या मतदारसंघातील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गायत्री शिंगणे यांना बळ दिले आहे.(Gaytri Shingne From Sharad Pawar NCP) त्यामुळे काकांविरोधात पुतणी शरद पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे यांनी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सिंदखेडराजा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन नावे समोर आली आहेत. परंतु, या दोन्ही नावांनी अद्याप तरी पक्षात अधिकृत प्रवेश केलेला नाही. मराठा लॉबीतली एक तरुण चेहरा म्हणून गायत्री शिंगणे यांच्याकडे पाहिले जात आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात त्यांनी आपले राजकीय अस्तित्व निर्माण करायला सुरूवात केली आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकींना त्या हजर राहत आहेत.(Gayatri Shingne in Action Mode) गेल्या 25 वर्षांपासून डॉ. राजेंद्र शिंगणे हे या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. मात्र अद्यापपर्यंत या सिंदखेडराजा तालुक्याचा कुठलाही विकास झाला नाही. हा विकास व्हावा यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे त्यांच्या विरोधात उभी ठाकली आहे. गायत्री शिंगणे यांनी आता निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गायत्री शिंगणे विरुद्ध राजेंद्र शिंगणे यांच्यात लढत होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latest Posts

Don't Miss