| TOR News Network |
Pune Porsche Accident Case Latest Update : राज्यात सध्या पुण्याच्या अपघाताची एक चर्चा सुरु आहे. सरकार यात कोणते पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Porsche Accident Case Pune) अशात मात्र पुणे काँग्रेसचे आमदार धंगेकरांनी सत्ताधारांवर गंभीर आरोप केले आहे. (Dhangekar Blame Dcm fadnavis) त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरें हे या प्रकरणात दिशाभूल करत असल्याचा आरोप धनगेकर यांनी केला आहे. (Fadnavis,pune cp Misguide in pune Accident case)
कलम 304 लावण्यावरुन धंगेकरांनी गृहमंत्री फडणवीसांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. (Mla Dhangekar objection on Section 304) भाजपनं मात्र आरोप फेटाळलाय. पुण्यातल्या अपघातानंतर, तिघांवर विरोधकांनी भडीमार केलाय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार..जे म्हणतायत की 4 दिवस होऊनही दारु पिवून कारनं दोघांना चिरडणाऱ्या, वेदांत अग्रवालचा ब्लड रिपोर्ट आलेलाच नाही.
तर धंगेकरांनी अजित पवार गटाचे पुण्यातल्या वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव आणून कमजोर कलमं लावण्यास दबाव आणल्याचा आरोप आहे. (Mla tingre pressure on pune police ) पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या विनीता देशमुख यांनी हा आरोप केलाय.
मंगळवारी गृहमंत्री फडणवीस तडकाफडकी पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात आले आणि पत्रकार परिषद घेवून आरोपी वेदांत अग्रवालवर कलम 304 लावलं आणि पहिल्याच FIR मध्ये लावल्याचं सांगितलं. (Fadnavis Pc on Pune Accident case)त्यावरुन धंगेकरांनी 19 तारखेचा पहिला FIR ट्विट करुन कलम 304 नाही तर कलम 304 अ लावल्याचं सांगितलं आणि पुणेकरांची फडणवीसांनी दिशाभूल केल्याचा आरोप केला.
पुण्यातल्या अपघात प्रकरणात पोलिसांनी 2 FIR दाखल केलेत. पहिला FIR 19 तारखेला सकाळी 8 वाजून 26 मिनिटांनी दाखल केलेला आहे आणि दुसरा FIR 20 तारखेला दाखल केलेला आहे. पहिल्या FIRमध्ये कलम 304 नसून कलम 304 अ स्पष्ट दिसत आहे. आणि दुसऱ्या FIRमध्ये 304 असून 304 अ सुद्धा आहे. आता धंगेकरांनी ट्विट करुन फडणवीसांवर दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.
कलम 304 आणि कलम 304 अ काय आहे फरक
कलम 304 म्हणजे, दुखापत करण्याच्या हेतूनं किंवा हेतू शिवाय खून करणे. यात दोषी आढळल्यास 10 वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा आहे. तर कलम 304 अ म्हणजे, निष्काळजीपणे किंवा कोणत्याही कृत्याने एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे. दोषी आढळल्यास 2 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. (Section 304 And Section 304 A)
4 दिवस झाले ब्लड रिपोर्टच आलेला नाही
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावरही विरोधक आक्रमक आहेत. कारण 4 दिवस झाले तरी, अमितेश कुमार म्हणतायत की, अजून वेदांत अग्रवालचा ब्लड रिपोर्टच आलेला नाही. (After 4 days no blood report) त्यामुळं असा कोणता रिपोर्ट आहे, ज्याला 4 दिवस लागूनही येत नाही, असा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्या प्रमाणं अल्कोहोल रिपोर्ट 12 तासांच्या आत सहज मिळतो. (Blood Report comes in 12 hours)
आमदारांचा पोलिसांवर दबाव
पुण्याच्या अपघात प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरेंवरही आरोप झालेत. रविवारी मध्यरात्री अपघातानंतर, दारुड्या वेदांतचा बाप, बिल्डर विशाल अग्रवालनं आमदार सुनिल टिंगरेंना फोन केला आणि त्यानंतर टिंगरेंनी येरवड्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या विनीता देशमुखांनी केला. तोच आरोप संजय राऊतांनी पण केला. तर टिंगरेंनी आरोप फेटाळले आहेत. वेदांतचे वडील बिल्डर विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गृहमंत्री फडणवीसांनी कडक कारवाईचं आश्वासन दिलंय. पण विरोधकांनी पहिल्या 2 FIRवरुन शंका उपस्थित करतानाच आरोप केलेत. (Pune Accident case 2 fir is 2 Suspicious)