Saturday, January 11, 2025

Latest Posts

मुंबईच्या जागावाटपात शिवसेनाच मोठा भाऊ

| TOR News Network |

Mahavikas aghadi Latest News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने राहिले आहेत.अशात जागावाटपाचा तिढा कायम आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत झालेल्या राजकीय घटनांमुळे राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकणार, कुणाला सत्ता देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशात मुंबईच्या जागा संदर्भात (Vidhansabha Election seat sharing) महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असून सध्यातरी शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे दिसून येत आहे.(shivsena to contest most seats in mumbai)

महाविकास आघाडीनेही कंबर कसली असून राज्यभरात, सभा, दौरे, मेळावे, बैठका सुरू आहेत. उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे. अशातच महाविकास आघाडीच्या गोटातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे.  महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे.(Mahavikas Aghadi seat sharing likely to final) यानिवडणुकीच्या दृष्टीने मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी असलेला तिढा  सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील जागावाटपात शिवसेना ठाकरे गट 20, राष्ट्रवादी काँग्रेस 7 आणि काँग्रेसला 18 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील जागावाटपात शिवसेनाच मोठा भाऊ ठरताना दिसत आहे. (Shivsena to contest on 20 seats in mumbai) खास बाब म्हणजे मुंबईतील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या मलबार हिलसाठी  काँग्रेस आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.

यात, धारावी, चांदिवली, मुंबादेवी,मालाड पश्चिम, सायन कोळीवाडा, कुलाबा, कांदिवली पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, वांद्रे पश्चिम , घाटकोपर पश्चिम, कुर्ला, भायखळा,  जोगेश्वरी पूर्व, मलबार हील, माहीम, बोरीवली, चारकोप या मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस कडून होणाऱ्या जागांची मागणी आणि महायुतीत मुंबईसाठी होणाऱ्या जागावाटपात काँग्रेसला कोणत्या जागा मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकी भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजप शिवसेनेची युती होती. शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेना भाजप युतीविरोधात  काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अशी लढत झाली होती. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या होत्यातर काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच 2019 मध्ये भाजप पहिल्या, अविभक्त शिवसेना दुसऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या आणि काँग्रेस चौथ्या स्थानावर होती.

Latest Posts

Don't Miss