Theonlinereporter.com – May 9, 2024
Gulabrao Patil latest News : महाराष्ट्रात २४ जागांवर लोकसभेचे मतदान झालं आहे. मात्र आता मुंबईसह नाशिक, पुणे या महत्वाच्या टप्प्यात येत्या काळात मतदान होणार असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या शहरांकडे लक्ष वळवत जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रचारसभानांही वेग आला आहे. दरम्यान, जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.(Gulabrao Patil’s statement under discussion)
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्यावेळी सगळेच आय लव्ह यू म्हणतात, दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते है. पण विधानसभेच्या निवडणुकीवेळी मात्र सगळे एकमेकांच्या विरोधात असतात, आय हेट यू म्हणतात. त्यांच्या या विधानावरून आता चर्चा रंगली आहे. (Gulabrao patil statement goes viral)
जळगावच्या अंमळनेर येथील महायुतीच्या मेळाव्यात जाहीर भाषणात गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. ‘विधानसभेच्या निवडणुकीत सर्व एकमेकांच्या विरोधात असतात मात्र लोकसभेच्या निवडणुकीत दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते..’ विधानसभेच्या निवडणुकीवेळी सर्वजण एकमेकांविरोधात उभे असतात.(in vidhansabha all goes against Says dada) पण लोकसभेच्या निवडणुकीवेळी, खासदारकीच्या वेळी शत्रूदेखील एकमेकांचे मित्र होता. आजच्या मंचावरच बघा… अंमळनेर मध्ये शिरीष चौधरी आणि अनिल पाटील यांच्यात आय लव यू.., तिकडे पाचोरा तालुक्यात किशोर पाटील आणि भाजपचे अमोल शिंदे यांच्यात आय लव यू.., धरणगाव मध्ये गुलाबराव पाटील आणि भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात आय लव यू. आणि विधानसभा निवडणूक लागली की, आय हेट यू ? असं गुलाबराव पाटील म्हणाले. एरवी आमची तोंडं वाकडी असली तरी देशाचं नेतृत्व ठरवण्यासाठी आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र येऊन देशाचे नेतृत्व ठरवणार आहोत ही महत्त्वाची बाब आहे, असं ते म्हणाले.
आम्ही लोकसभेत मदत करतोय, तुम्ही विधानसभेत मदत करा, नाही केली तर लक्षात ठेवा..अस मंत्री गुलाबराव पाटील यांचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर स्मिता वाघ यांना अप्रत्यक्षरीत्या सूचक इशारा दिला.(gulabrao patil alert smita wagh) तुम्ही जर आम्हाला टाळलं तर रेल्वे अमळनेरला पोहोचू देणार नाही, एवढी दादागिरी करू अस म्हणत गुलाबराव पाटील यांनी इशारा दिला.(We will do dadagiri says gulabrao patil)