Tuesday, November 19, 2024

Latest Posts

आपल्या देशात लॉ आहे फक्त ऑर्डर नाही

मनसेकडून राज ठाकरे यांचा जुना व्हिडीओ व्हायरल

| TOR News Network | MNS Tweets On Old Video Of Raj Thackeray :आपल्या देशात कायदे आहे, म्हणजे Law आहे फक्त order नाहीये. मला असं वाटतं order ची गरज आहे. आणि त्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. माझा मुंबई पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे. मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिसांवर 100 % विश्वास आहे. (I Believe On Mumbai And Maharashtra Police)

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर मनसेकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीमधील एका भागाचा व्हिडीओ मनसेने ट्विट केला आहे. मुंबई पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मांडल होतं.(Give 48 Hours Of Free Hand To Mumbai Police)

दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. गेल्या काही दिवसात राज्याच गोळीबाराच्या, गुन्ह्यांच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर भर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गोळीबार केला. तर काल दहिसरमध्ये मॉरिसने केलेल्या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. (Dahisar Bullet Firing) या संपूर्ण घटनेमुळे राज्यात खळबळ माजली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वातावरण चांगलंच तापलं असून विरोधकांनीही राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.

मुंबई पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या

याच पार्श्वभूमीवर, राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर मनसेकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीमधील एका भागाचा व्हिडीओ मनसेने ट्विट केला आहे.(Raj Thackeray old Video Tweet by Mns) मुंबई पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मांडल होतं. तोच व्हिडीओ आता पुन्हा ट्विट करण्यात आला आहे.

अजित पवारांनीची नाराजी – मनसेने आणखी एक पोस्ट एक्सवर केली

काय म्हणाले राज ठाकरे ?

मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिसांच्या हातात 48 तास द्या, आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या. (Mumbai And Maharashtra Police)सगळ्या, सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात, पण (काही करायचं) ऑर्डर्स नसतात, अशा वेळेस रिस्क कोम घेईल ? पोलिसांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्यांना जर जेलमध्ये जाव लागत असेल, तर का जातील ते जेलमध्ये, कोणासाठी जातील ? (खुर्चीवर) बसलेलाच माणूस टेम्पररी (तात्पुरता) आहे, त्याच्यासाठी यांनी कायमचं जेलमध्ये जायचं, याला काही अर्थ आहे का ? असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं. आपल्याकडे उत्तम काम करणारे पोलिस अधिकारी आहेत, महाराष्ट्र भाग्यवान आहे त्याबाबतीत. त्यांना फक्त 48 तासांचा मोकळा हात द्या, असा पुनरुच्चार त्यांनी मुलाखतीत केला.(Give Free Hand To Police For 48 Hours)

त्यांच्या भाषणातील काही मिनिटांचा व्हिडीओ MNS अधिकृत त्यांच्या अकाऊंटवर ट्विट केला आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखायची असेल तर 48 तासांसाठी महाराष्ट्र पोलिसांना मोकळीक द्या… महाराष्ट्रातून गुन्हेगारी नाहीशी होईल ! असे त्या व्हिडीओच्या शेवटी लिहीण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss