Friday, January 17, 2025

Latest Posts

विधानसभेला देखील बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार

Theonlinereporter.com – May 17, 2024 

Ajit Pawar Latest News : महाराष्ट्रात सगळ्यांच लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. (Baramati lok sabha news) इथे पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. बारामतीमधील ही बिग फाईट म्हणजे वर्चस्वाची लढाई आहे. (Big fight in baramati) बारामतीच्या निकालाने महाराष्ट्रातील भविष्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. काका-पुतण्याच्या या लढाईत बारामतीकर कोणाला कौल देतात? याकडे उभ्या महाराष्ट्रात लक्ष लागलं आहे. (All Attention on baramati result) आता पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत देखील अजित पवार यांच्या विरुध्द पवार कुटुंबातील व्यक्ती असणार असल्याची जोरदार चर्चा बारामतीत सुरु आहे. (Baramati vidhansabha pawar vs pawar )

लोकसभेनंतर विधानसभेला सुद्धा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना होऊ शकतो. (in vidhansabha pawar vs pawar) विधानसभेला बारामतीमध्ये अजित पवार यांना पवार कुटुंबातूनच आव्हान मिळू शकतं. त्याची तयारी सुद्धा सुरु झाली आहे. अजित पवार यांना विधानसभेला युगेंद्र पवार आव्हान देऊ शकतात.(yugendra pawar vs ajit pawar) म्हणजे आता जशी अजित पवार यांची त्यांच्या काकांबरोबर लढाई सुरु आहे, तसच विधानसभेला पुतण्याच अजित पवारांना आव्हान देऊ शकतो. (yugendra pawar can challenge ajit pawar) युगेंद्र पवार अजित पवार यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार यांचा पुत्र आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवार बारामतीच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत.

युगेंद्र पवार आठवड्याचे चार दिवस बारामतीमध्येच थांबणार असल्याची माहिती आहे. दर मंगळवारी शरद पवार गटाच्या कार्यालयात बसून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणार आहेत. युगेंद्र पवार आधीपासूनच बारामतीमध्ये सामाजित कार्यात सक्रीय आहेत. (yugendra pawar social activist) आता विधानसभेच्या माध्यमातून ते राजकारणात उतरू शकतात. (yugendra pawar in politics) शरद पवार यांचा आणखी एक नातू रोहित पवार आधीपासूनच राजकारणात सक्रीय आहे. रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सुप्रिया सुळेंसाठी युगेंद्र पवार आणि रोहित पवार दोघांनी प्रचाराचा मोर्चा संभाळला होता.

Latest Posts

Don't Miss