Saturday, January 11, 2025

Latest Posts

तिसरी आघाडीची आज महत्त्वाची बैठक

| TOR News Network |

Maharashtra Politics Latest News : विधानसभा निवडणुका बघता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. (Vidhansabha Election 2024) पक्षांच्या बैठका, जागावाटप, सभा, गाठीभेटी यांना वेग आला आहे. असं असतानाच आता राज्यात छोट्या पक्षांनी एकत्रित येत तिसऱ्या आघाडीसाठीच्या हालचाली सुरू केली आहे.(Third Front in Maharashtra) आज संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. (Third Front Meeting Today) विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष देखील एकत्रित येत राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार असल्याची चिन्ह दिसत आहे. ही तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी आज बैठक होत आहे.

आज पुण्यात पार पडणाऱ्या तिसऱ्या आघाडीची महत्वाची बैठकीमध्ये स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्षाचे बच्चू कडू, डॅा.बाबासाहेब आंबेडकारांचे पंतु राजरत्न आंबेडकर आणि इतर घटक पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती आहे. राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूकींच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, बच्चू कडू (Bachchu Kadu Prahaar Party in Third Front Meeting) यांचा प्रहार पक्ष, राजरत्न आंबेडकर व माजी सैनिक, शेतकरी घटकपक्षांना एकत्रित घेवून आज बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.

पुणे शहरातील स्वराज्य पक्षाच्या ‘स्वराज्य भवन’ येथील कार्यालयात दुपारी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.(Third Front Meeting in Pune) यापूर्वी स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे, प्रहार पक्ष प्रमुख बच्चू कडू  यांच्या पुणे, मुंबई येथे दोन तीन बैठका देखील झाल्या आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पंतु देखील यात सहभागी होत आहेत. तसेच बैठक संपन्न झाल्यानंतर एकत्रित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यामुळे आता राज्यात तिसरी आघाडी स्थापन होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss