| TOR News Network | IG Sandeep Patil Latest News : महाराष्ट्र नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महासंचालक संदीप पाटील यांनी एक खळबळजनक माहिती दिली आहे.(IG Sandeep Patil Exciting information) दिल्लीजवळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात माओवादी संघटना सक्रीय असल्याचं वक्तव्य त्यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. (Maoist involved in Delhi Farmer Protest)
लोकसभा निवडणुकीसाठी टार्गेट
संदीप पाटील म्हणाले, “येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सरकारविरोधात सूर कसा निर्माण होईल. (How will the tone be created against government) तसेच शासनाला कसं बदनाम करता येईल यासाठी आपण अशी मोठी आंदोलनं सुरु करायची आहेत. ज्यामुळं शासन अडचणीत येईल, काही ठिकाणी हिंसा होईल आणि लोक कसे शासनाविरोधात जातील, अशी माओवाद्यांमध्ये चर्चा आहे. त्यांचा लोकशाहीवर आणि संविधानावर विश्वास नाही”
आंदोलनासाठी भूमिगत नेटवर्क कार्यरत
गेल्यावेळी शेतकरी आंदोलनाला यश आलं होतं त्यानंतर सध्याच्या आंदोलनासाठी देखील त्यांचं भूमिगत नेटवर्क काम करत होतं. माओवादी नेते या आंदोलनाचं नेतृत्व करणार असल्याचं त्यांच्या चौकशीतून समोर आलं आहे. गेल्यावेळी संयुक्त किमान मोर्चाचे जे मुख्य नेते होते त्यांना आत्ताच सीपीआय माओवादी पक्षातून मोठं पत्रक काढत त्यांची हाकालपट्टी करण्यात आली.
या पत्रात लिहिलं होतं की, ते आमचे सेन्ट्रल कमिटी मेंबर होते, त्यांनी गेल्यावेळच्या शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. पंजाब, हरयाणा आणि उत्तरेतील भागातील किसान मोर्चाचे माओवादी संघटनेचं नेटवर्क आहे, असं त्यांच्याकडील कागदपत्रांवरुन समोर आलं आहे, असंही संदीप पाटील यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांचा मोर्चा : पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याची प्रमुख मागणी
या आंदोलनातही होता सहभाग
दरम्यान, माओवाद्यांचं मोडस ऑपरेंडी हीच आहे की मोठ्या प्रमाणावर हिंसा करायची त्यानतंर सरकार त्यांच्यावर कडक कारवाई करेल, त्यानंतर ते सरकारपासून दूर जातात. त्यानंतर या लोकांना आपण कशा पद्धतीनं आपल्या माओवादी विचारसरणीकडं घेऊ शकतो, अशा पद्धतीनं ते काम करतात.आपल्याकडं बारसू रिफानरीचं आंदोलन आणि आरे आंदोलनातही ते होते. (Maoist Also involved in aarey Protest) अशा प्रकारे कुठेही जनअसंतोष दिसला तर त्याला कसं वाढवायचं आणि आपलं हित साधायचं हे ते करतातच असंही संदीप पाटील यांनी म्हटलं आहे.