Saturday, January 11, 2025

Latest Posts

मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर 20 वर्ष यांना रुळावर येऊ देणार नाही

| TOR News Network |

Manoj Jarange Patil Latest News : देश स्वतंत्र नव्हता, तेव्हापासून मराठ्यांचे आरक्षण आहे. (Jarange Patil on Reservation) आमचे रेकॉर्डला आहे. ते आरक्षण घेणार आहोत. ओबीसी आणि कुणबी एकच आहेत आणि आम्ही ते घेणार आहोत.(Jarange Patil on OBC) सग्या-सोयऱ्याचे आरक्षण टिकणार नाही असे महाजन म्हणत असतील तर त्यांचा डाव आहे” असं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले. फडवणीस यांच्यावर माझा विश्वास आहे. (Jarange Patil On Devendra Fadnavis) आम्हाला भिडवत ठेवतील तर हे पडतील. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर 20 वर्ष यांना रुळावर येऊ देणार नाही” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. (Jarange Patil Warning) “गरज पडल्यास मराठा उभा करणार नाही, पण त्यांना निवडून येऊ देणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“आम्ही हाके यांना विरोधक मानत नाही, त्यांनी त्यांचे आंदोलन करावे.(Jarange Patil On OBC Leader Hake) सग्या सोयऱ्याची आम्ही दिलेल्या व्याख्ये प्रमाणे घेतले तर आम्हाला मान्य.आमच्या व्याख्येप्रमाणे सग्या सोयऱ्याची अमलबजावणी केली नाही, तर ते आम्हाला मान्य नाही. त्यांनी पाठवलेल्या चार न्यायमूर्तींना कळत नव्हते असे गिरीश महाजन यांना म्हणायचे आहे का? (Jarange Patil on Girish Mahajan) आरक्षण सरकारला टिकू द्यायचे नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आणि कुणबी एक नाही हे माझ्या समोर येऊन सिद्ध करावे. ज्याला घ्यायचे त्याने कुणबी प्रमाणपत्र घ्यावे. मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्यामुळे सरसकट आरकक्षण द्यावे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटत नाही” असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

Latest Posts

Don't Miss