| TOR News Network | Vanita Raut Chandrapur News : महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणूकीचा प्रचार जोरात सुरु आहे. या प्रचारादरम्यान एका महिला उमेदवाराने अजबगजब आश्वासन येथील मतदारांना दिले आहे. मी निवडणूक जिंकली, तर प्रत्येक गावात बिअर बार उपलब्ध करुन देईन, तसेच कमी दरात लोकांना व्हिसकी देईल असं वनिता राऊत या उमेदवाराने म्हटलं आहे. (Loksabha Candidate commitment beer bar in every village) महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्या अखिल भारतीय मानवता पार्टीच्या सदस्य आहेत.(Vanita raut chandrapur)
निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार कुठलं आश्वासन देईल याचा नेम नसतो. काही उमेदवार निवडणूक जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासन देतात. त्यांना मर्यादेच भान राहत नाही. असाचं काही आश्वासन चंद्रपूरच्या महिला उमेदवार वनिता राऊत यांनी दिले आहे.त्या म्हणाल्यात “मी लोकसभेला निवडून आली, तर प्रत्येक गावात फक्त बिअर बार उघडणार, सोबत खासदार निधीतून परदेशी दारु आणि बिअर उपलब्ध करुन देईन” अस वनिता राऊत यांनी म्हटलं आहे. (Will provide foreign liquor and beer from MP funds)‘जिथे गाव, तिथे बिअर बार’ असा प्रचार सध्या वनिता राऊत करत आहेत. (Jahan gaanv, waha beer baar) रेशनिंगच्या माध्यमातून परदेशी दारु उपलब्ध करुन देईन.(Foreign liquor through rationing) त्यासाठी पिणाऱ्यांना आणि विक्रेत्यांकडे परवाना आवश्यक असेल. वनिता राऊत आपल्या मुद्याचा समर्थन करताना सांगतात की, “खूप गरीब लोकांना दारु पिण्यामध्ये समाधान मिळत. (Chandrapur loksabha candidate vanita Raut ) पण त्यांना महागडी दारु, बिअर परवडत नाही. त्यांना देशी दारुवर समाधान मानाव लागत. मला त्यांना परदेशी दारुचा आनंद द्यायचा आहे”
वनिता राऊत यांची निवडणूक लढवण्याची ही पहिली वेळ नाहीय. 2019 साली त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली. 2019 मध्येच चिमूरमधून विधानसभेची निवडणूक लढवलेली. 2019 च्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी हेच आश्वासन दिलं होतं. निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत डिपॉझिट जप्त झालं होतं. यावेळी सुद्धा त्या तसाच प्रचार करत आहेत.