Monday, January 13, 2025

Latest Posts

मुंबईत आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने केली आत्महत्या

| TOR News Network |

Mumbai Sucide Latest News : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने जीवन संपवून घेतलं. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली. मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली. मंत्रालयासमोर सुनीती इमारत आहे. तिथे 10 व्या मजल्यावर विकास रस्तोगी राहतात.(IAS Officer’s daughter suicide news)

त्यांच्या मुलीने 10 मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. (Lipi rastogi suicide case) आत्महत्येमागे काय कारण आहे? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर आहेत. लिपी रस्तोगी असं आत्महत्या करणाऱ्या मुलीच नाव आहे. 10 व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला. (Lipi rastogi ended life)

मृत मुलगी LLB च शिक्षण घेत होती. ती 27 वर्षांची होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. (Lipi rastogi suicide note) त्यातून काही माहिती समोर येऊ शकतो. मध्यरात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनास्थळी कफ परेड पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहे. सरकारमधील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे जीवन संपवून घेणं ही साधी गोष्ट नाहीय. विकास रस्तोगी शिक्षण विभागात सचिव आहेत तर त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगी चलन विभागात सचिव आहेत.

Latest Posts

Don't Miss