Monday, January 13, 2025

Latest Posts

उमेदवारी बद्दल रावसाहेब दानवेंनाही नो गॅरंटी 

| TOR News Network | Danve on Lok Sabha Election : लोकसभेची निवडणूक बघता सर्व पक्षात सध्या उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरू आहे.अशात सर्वांचे लक्ष लागलेल्या बीड मध्ये उमेदवारीबाबत प्रचंड संभ्रम असल्याचं चित्र आहे. भाजपकडून बीडमधून पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे यांना उमेदवारी द्यावी, असा प्रश्न असताना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानानं पेच आणखी वाढला आहे. प्रीतम मुंडे, भागवत कराड आणि माझीही उमेदवारी नक्की नाही, असं वक्तव्य दानवे यांनी करून सर्वांना अचंबित केले आहे.(Raosaheb Danve on Seat Allocation in Beed)

लोकसभा निवडणूक जाहीर झाली नसली तरी, त्याआधीच महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडाला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती, तसेच इतर पक्षही जागावाटपाबाबत चर्चा करत आहेत.(Maharashtra loksabha Seat allocation) महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत जागावाटप जाहीरही होतील. पण त्याआधी काही जागांवरून पेच वाढलेला दिसून येत आहे.

मैदानात कोण पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे

भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या बीड मतदारसंघात उमेदवारीबाबत कमालीचा संभ्रम असल्याचं चित्र आहे. पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे, असा प्रश्न नेतृत्वाला पडलेला असतानाच, भाजपचेच ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका वक्तव्यानं सस्पेन्स वाढवला आहे. (Pankaja Munde or Pritam Munde in loksabha) खासदार प्रीतम मुंडे, डॉ. भागवत कराड आणि माझीही उमेदवारी नक्की नाही, असं दानवे म्हणाले.

राजकारणात माझ्यासोबत विश्वासघात झाला – पंकजा मुंडे

वक्तव्यामुळे संभ्रमात आणखी भर

प्रीतम मुंडे, कराड आणि माझी उमेदवारी निश्चित नाही असं सांगतानाच, भाजपमध्ये पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल, तो अंतिम असतो, असं रावसाहेब दानवे म्हणाले. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं संभ्रमात आणखी भर पडली आहे.दुसरीकडे रामदास कदम यांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे. याबाबत रावसाहेब दानवे यांना विचारलं असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. मित्रपक्षांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम आम्ही करू. त्यांची समजूत काढण्यात येईल आणि योग्य मार्ग काढू, असं ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss