Saturday, January 11, 2025

Latest Posts

येथे पोलीसच सुरक्षित नाहीत मग आमच्या बहिणीच्या रक्षणाचे कसे

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्यांचे सरकार आल्यापासून महिलांवरील, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ झाली आहे’, असे ते म्हणाले. (Sanjay Raut Slams BJP) पुण्यात रविवारी पोलिसावर हल्ला करण्यात आला होता. त्यावर संजय राऊत म्हणाले, ‘हा पोलिसावरचा नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. (Sanjay Raut Demand DCM Fadnavis Resignation)

 

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणालेत येथे त्यांचे पोलीस सुरक्षित नाहीत. ते आम्हाला सांगतात की, ते आमच्या बहिणीचं रक्षण करतील.(Sanjay Raut On Police Attack) पुण्यात सर्वात जास्त अंमली पदार्थाचा व्यापार आणि व्यवहार होतो. ललित पाटील प्रकरणातील सूत्रधार कोण आहे हे आपण पाहिलेला आहे. पोलीस यंत्रणा कशी विकली गेली हे देवेंद्र फडणवीस यांना माहित नाही का? पुण्याचे पालकमंत्री नेमके काय करत आहेत, जे गुलाबी कपड्यात फिरत आहेत’.(Sanjay Raut On Ajit Pawar)

नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनावर त्यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ‘हुकूमशाहीचा पराभव व्हावा. नांदेडला लागलेल्या गद्दारीचा जो डाग होता तो धुवून काढण्यासाठी त्यांची प्रकृती बरी नसताना देखील ते उभे राहिले आणि नांदेडच्या जनतेने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. वसंत चव्हाण इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असे वाटले नव्हते.(Sanjay Raut on Vasant Chavhan) आम्ही सर्व शिवसेना परिवारत्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला आणि तो जिंकला पण दुर्दैवी आजाराने ग्रस्त झाले त्यांचे निधन झाले’.

Latest Posts

Don't Miss