Saturday, January 11, 2025

Latest Posts

नाशिक मधुन गोडसेंची उमेदवारी जवळपास फायनल

| TOR News Network | Nashik Lok Sabha Latest News : नाशिकच्या जागे संदर्भात हेमंत गोडसे की अजय बोरस्ते यांच्यात रस्सीखेच सुरु होती. अशात दोन्ही संभाव्य उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर हेमंत गोडसेंनी नाशिकची जागा (Nashik shivsena seat to hemant godse) शिवसेनेलाच मिळणार, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी २ दिवसांत उमेदवारी जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं हेमंत गोडसेंनी (Hemant Godse to be final from nashik) माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा कायम आहे. गोडसे म्हणाले की, अजय बोरस्ते यांनी देखील माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने मला उमेदवारी (Nashik Lok Sabha Constituency) द्यावी, हे मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. मित्र पक्षांचा दावा असला तरी जागा विद्यमान खासदार असलेल्या शिवसेनेलाच सुटेल, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे.(Godse confident about nashik seat)

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा भेट घेतली होती. (boraste godse meet cm)छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर नाशिकमधून शिंदे गटाचा मार्ग (Lok Sabha Election) मोकळा झाला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.

मात्र, नशिकमधून अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु येत्या दोन दिवसात हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताकदीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रात्री उशिरा गोडसे नाशिकमध्ये दाखल झाले होते.

महायुतीमध्ये नाशिकच्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे, यांच्यासोबतच अजय बोरस्ते देखील आग्रही होते. परंतु छगन भुजबळ यांनी माघार घेत असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये जाहिरपणे सांगितलं आहे. परंतु आता छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा प्रचाराचा धडाका सुरू आहे, (Mahavikas aghadi campaign in full swing in nashik) तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. आता नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, असं वक्तव्य हेमंत गोडसेंनी केलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात पार पडणार आहे.

Latest Posts

Don't Miss