Sunday, January 12, 2025

Latest Posts

पुढचे दोन दिवस विदर्भासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार

| TOR News Network |

Rain Updates Latest News : राज्यात जून महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस जुलै महिन्यात सक्रीय झाला आहे. राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस बसरणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.(Next Two Days Heavy Rain Alert in Maharashtra) पुढचे दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्ती केली आहे.(Rain Alert in Vidharbha)

राज्यातील काही भागांत ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.(Orange Alert In Maharashtra) पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भासह,पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि नांदेड मध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण, गोवा कर्नाटकासह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे.(Rain In Mumbai) वसई, विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून दमदार पावसाची हजेरी सुरु आहे. मुंबईत आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर विदर्भात नागपूरसह,वाशिम,बुलडाणा,अकोला येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.(Rain to fall likely in Nagpur,akola)

लोणावळ्यात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर बंधारे वाहू लागले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना जवळपास असलेलं कुंडमळा येथील धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागलेत. मावळात सतत पडत असणाऱ्या पावसाने येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून याचा आनंद पर्यटक घेऊ लागलेत.

मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने लोणावळ्यात सध्या धुक्याची चादर पसरली आहे.(Sheet of Fog in lonavala) घाट माथ्यावरील पट्टा धुक्यात हरवल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. थंडगार वारे आणि दाट धुके यामुळे लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झाला आहे.

Latest Posts

Don't Miss