Saturday, January 11, 2025

Latest Posts

माथाडी कामगार सेनेतर्फे हृदयरोग तपासणी शिबिर

| TOR News Network | | Heart disease camp by Mathadi Kamgar Sena |नागपूर. माधवबाग हॉस्पिटल कोंढाळी व माथाडी कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी सभागृह दत्तात्रयनगर हुडकेश्वर रोड येथे हृदयरोग तपासणी शिबिर व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यात आले. कार्यक्रमाला आमदार अभिजीत वंजारी, काँग्रेस नेते गिरीश पांडव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन आशिर्वाद नगर जेष्ठ नागरिक गार्डन क्लब व शिवसेनेच्या माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सिद्धेश्वर कोमजवार, विजय कडू, वामन साळवे, डॉ. दीपकराव शेंडेकर, माधुरी घोसेकर, विनायकराव वाघ, किसन गनेरकर, यांच्या पुढाकाराने करण्यात आले. डॉ. कीर्ती सावरकर, प्रीती श्रीवास, अविनाश चरडे, पूनम मांडवगडे यांनी आरोग्य तपासणी केली.

शिबिरामध्ये शंभरावर नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. ईसीजी, ब्लड प्रेशर चेकअप, रँडम ब्लड शुगर, हार्टरेट, पल्स रेट, बीएम आय आदी तपासण्या नाममात्र 20 रुपये शुल्कात करण्यात आल्या. पुरुषोत्तम तातोडे, सुभाष गुजर, विलासराव इटनकर, धनराज आकोटकर, बांडाने साहेब, श्याम कामत, भानुदास खेडकर, शंकरराव चौधरी, गौतम मेश्राम, भोला पटेल, दुरुपकर साहेब, अंनजनकर साहेब,आशा कोमजवार, ममता बावणे, प्रिया यादव, माया वर्मा आदींनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss