Sunday, November 17, 2024

Latest Posts

त्यांनी पंक्चर काढले, गाड्यांच्या दुरुस्तीचे काम केले…आता मोदी सरकार मध्ये आहेत मंत्री

| TOR News Network |

Virendra Kumar Khatik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. एनडीएच्या 72 उमेदवारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.मात्र यात मध्य प्रदेशातील टिकमगड येथील खासदार वीरेंद्र कुमाकर खटीक हे खास आहेत. वीरेंद्र कुमार त्यांच्या साध्या, सरळ जीवनचार्यामुळे ओळखले जातात.(Virendra kumar khatik simplicity) 2017 मध्ये ते मोदी कॅबिनेटमध्ये महिला आणि बाल विकास राज्यमंत्री झाले. त्यानंतर 2021 मध्ये सामाजिक न्यायमंत्री त्यांना बनवण्यात आले.यंदा ते ४ लाखांच्या मताधिक्याची लिड घेत निवडून आले व परत मंत्री झालेत.(Virendra kumar khatik took Oath in modi govt)

सागर जिल्ह्यातील अतीसामान्य परिवारात 27 फेब्रुवारी 1954 रोजी वीरेंद्र कुमार खटीक यांचा जन्म झाला. परंतु मेहनतीने त्यांनी सागर विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. शिक्षण करत असताना वीरेंद्र कुमार यांनी गाड्यांचे पंक्चर काढण्याचे काम केले.गाड्यांची रिपेरिंग त्यांनी केले. दिग्गज नेता अजूनही आपल्या जुन्या स्कुटरवर सर्वसामान्य लोकांमध्ये जातात. यामुळे 1996 मध्ये लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा यश मिळवल्यानंतर (Virendra kumar khatik Won lok sabha) त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंकज अहिरवार यांना 4 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले.

खासदार वीरेंद्र कुमाकर खटीक यांचा प्रवास

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शाखाप्रमुख होते. 1975 मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या संपूर्ण क्रांती चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता.आणीबाणी लागू केल्याच्या निषेधार्थ सागर आणि जबलपूर यांना अंतर्गत सुरक्षा कायदा (MISA) अंतर्गत 16 महिन्यांसाठी तुरुंगात टाकण्यात आले. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी चळवळ सुरू केली आणि त्यांच्या मदतीसाठी वाचनालय सुरू केले.1982 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासून भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.दलित नेते वीरेंद्र कुमार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील टिकमगड मतदारसंघ 8 व्यांदा विजय मिळवला. मागील मंत्रालयात, ते सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात कॅबिनेट मंत्री होते. मोदी मंत्रिमंडळात त्यांनी महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.कुमार खटीक यांनी डॉक्टर हरिसिंह गौर विद्यापीठ सागर येथून अर्थशास्त्रात एम. ए. केले. त्यानंतर बाल श्रम हा विषय घेऊन पीएचडी केली.

Latest Posts

Don't Miss