Saturday, January 11, 2025

Latest Posts

हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ : भाजप अडचणीत

| TOR News Network |

Harshvardhan Patil Latest News : भाजपाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  यांच्या एका वक्तव्याने सध्या खळबळ उडाली आहे. ( (Harshvardhan patil Statement goes viral) ) पाटील यांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाक व्यक्त काश्मीरशी केली आहे. (Ichalkaranji As Pak Express Kashmir) धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, असं वादग्रस्त विधान हर्षवर्धन पाटलांनी  केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Harshvardhan Patil may be in trouble)

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे विजयी झाले. या मतदार संघात इचलकरंजी विधानसभा मतदार संघही येतो. हा मतदार संघ म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आहे असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. निवडणुकीवेळी अनेक घटक अॅक्टीव्ह होते. सर्व प्रकारची यंत्रणा राबवली जात होती. त्यात इचलकरंजी सारख्या पाकव्याप्त काश्मीर असलेल्या मतदार संघाचाही समावेश होता असे पाटील म्हणाले.(Harshvardhan Patil controversial statement) अशा वावटळातही यशाचा दिवा धैर्यशील माने यांनी लावला असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी माने यांचे अभिनंदनही केले. हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजीला थेट पाकव्याप्त काश्मीर म्हणून उपमा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली असून पाटलांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे .

माजी मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील सद्या भाजपात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. (Harshvardhan Patil Restless in Bjp) या चर्चांना आता सोशल मिडियात व्हायरल होणा-या एका पोस्ट ने खत पाणी दिले आहे.  हर्षवर्धन पाटील हे बावडा येथील रत्नाई निवासस्थानी नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी उपलब्ध असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होतीय. हर्षवर्धन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे.(Patil PRO Office) या पोस्ट वरती फक्त हर्षवर्धन पाटील यांचा फोटो आहे.  मात्र या पोस्ट मधून कमळ चिन्ह आणि भाजपचे नेते गायब आहेत. त्याहून पलीकडे ही पोस्ट हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील (Rajvardhan Patil)यांनीच शेअर केली आहे. त्यावर हर्षवर्धन पाटील सध्या भाजपा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलयं. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील विधानसभेची अपक्षाची तयारी करताहेत असेही बोललं जात आहे.

Latest Posts

Don't Miss