Friday, January 17, 2025

Latest Posts

गुड न्यूज… Hardik Pandya चे या सामन्यात कम बॅक

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात गुण तालिकेच्या क्रमवारीत १२ गुणांसह नंबर वन वर आहे. सहा पैकी सहा सामने जिंकत भारताने स्पर्धेत आपले वर्चस्व सिध्द करत दबदबा कायम राखला आहे.अशात भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघा बाहेर आहे.मात्र आता त्याच्या संदर्भात एक गुड न्यूज पुढे आली आहे.तो आगामी या सामन्यातून पुनरागमन करणार आहे.

बांगलादेश विरुध्दच्या सामन्यात दुखापत झालेल्या हार्दिक पांड्या बद्दल एक नवी अपडेट पुढे आले आहे.लवकरच हार्दिक पांड्याच्या चाहत्यांना तो मैदानावर खेळताना दिसणार आहे.सुरु असलेल्या विश्वचषकात भारतीय खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत.नुकतेच इंग्लंड विरुध्द झालेल्या सामन्यात हिट मॅन रोहित शर्मा व मोहम्मद शामीने भारताला सावरले होते.या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर असलेला हार्दिक पांड्याची उणीव जाणवली होती.सध्या हार्दिक एनसीएमध्ये आहे.एक मेडीकलचे विशेष पथक त्याच्यावर उपचार करत आहे. बांगलादेश विरुध्द खेळताना तो जखमी झाला होता. यात त्याच्या पायाचा लिगामेंट फाटला होता.त्यामुळे तो उपचार घेत असून तो लवकरच खेळताना दिसणार आहे.पांड्या टीम इंडियाचा एक आक्रमक चेहरा असून तो गोलंदाजी सोबतच फलंदाजीही करतो.त्याने अनेकदा भारताला तारले आहे.असा अष्टपैलू खेळाडू संघा बाहेर असणे नक्कीच कोणत्याही संघासाठी ते घातक आहे.विश्वचषक जिंकायचे मनसुबे ठेवणाऱ्या भारताला संतुलीत संघ ठेवणे गरजेचे आहे.पुढे उपात्य फेरी होणार आहे.दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या संघासोबत भारत भिडणार आहे.त्यामुळ लवकरच दुखापत झालेला पांड्या मैदानावर परतावा अशी आशा पांड्यासह देशाच्या क्रिकेट प्रेमींना आहे.गोलंदाजी करताना बांगलादेशाच्या फलंदाजाने थेट समोर फटका लगावला होता.तो पायाने अडवताना पांड्याला दुखापत झाली होती.आता पांड्या बऱ्या पैकी दुखापतीतून सावरला असून तो सध्या सराव देखील करु लागल्याची माहिती आहे.एका मिडीया रिपोर्टनुसार पांड्या १५ आणि १६ नोव्हेंबरला होणाऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात (In This Match Hardik Pandya Will be Back in Action) खेळताना दिसणार आहे.दुखापतीमुळे पांड्या संघा बाहेर असणे हे भारतासाठी मोठा धक्का होता.

Latest Posts

Don't Miss