Monday, January 13, 2025

Latest Posts

गुजरात टायटन्सच्या क्रिकेटपटूचा भीषण बाईक अपघात

| TOR News Network | Gujarat Titans Robin Minz Accident News : आयपीएल 2024 सुरु हेण्यापूर्वीच गुजरात टायटन्स संघासाठी एक वाईट बातमी आहे. संघाचा स्टार खेळाडू रॉबिन मिन्झ याच्या बाईकचा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात गुजरातने रॉबिनला 3.6 कोटी रुपये देऊन विकत घेतले आहे. रॉबिन आयपीएलमध्ये विकला जाणारा पहिला आदिवासी खेळाडू आहे. (Gujarat Titans’ Robin Minz Bike accident)

या अपघातात रॉबिनला गंभीर दुखापत झालेली नाही. त्याला किरकोळ दुखापत झालीय. पण त्याच्या बाईकच मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. मिंजच्या प्रकृतीला धोका नाहीय, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. बाईकच्या पुढच्या भागाच नुकसान झालय. मिंजच्या उजव्या गुडघ्याला मार लागलाय.

धोनीने रॉबिनच्या वडिलांना शब्द दिला

रॉबिन मिंजचे वडिल रांची एअरपोर्टवर सिक्युरिटी गार्ड आहेत. एकदा त्यांची महेंद्रसिंह धोनी बरोबर भेट झाली होती. त्यावेळी धोनीने रॉबिनच्या वडिलांना शब्द दिला होता की, आयपीएल 2024 च्या लिलावात रॉबिनला कोणी विकत घेतलं नाही, तर चेन्नई सुपर किंग्स त्याला विकत घेईल. मिंजसाठी चेन्नई सुपर किंग्सने सुद्धा बोली लावली. त्यांनी 1.20 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. पण नंतर माघार घेतली. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबादने सुद्धा रॉबिनसाठी बोली लावली होती. अखेरीस गुजरातने बाजी मारली. गुजरात टायटन्सने 3.60 कोटी रुपये मोजून रॉबिनला विकत घेतलय.

आपलं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न

रॉबिने वडिल लष्करातून निवृत्त झाले आहेत. मुलाला आयपीएल टीमने विकत घेतल्याच समजल्यानंतर ते भावूक झाले होते. रॉबिनच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. रॉबिन त्यावेळी आईला म्हणालेला की, आता रडण्याची गरज नाही. सर्वकाही ठिक होईल. आयपीएलने अनेक खेळाडूंच आयुष्य बनवलय. रॉबिन सुद्धा आयपीएल खेळून आपलं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करेल. आता दुखापतीमधून सावरुन मैदानावर पुनरागमन करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

Latest Posts

Don't Miss