Monday, January 13, 2025

Latest Posts

भाजपला मोठा धक्का : नेत्यांची फौज ठाकरे गटात करणार प्रवेश

| TOR News Network |

Sambhajinagar Bjp News : लोकसभेत मिळालेले यश बघता आता अनेक नेते मंडळींची पावले महाविकास आघाडीच्या दिशेने वळत आहेत. त्याची प्रचेती संभाजीनगर मध्ये बघायला मिळात आहे. संभाजीनगर येथील भाजपचे माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह 10 पेक्षा अधिक नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.(Many corporator to join UBT Group) येत्या 7 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगरमध्ये होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा प्रवेश सोहळा होणार आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.(Big Shock to Bjp in Sambhajinagar)

आम्ही फक्त शिंदे गट आणि भाजपसाठीच काम करायचं का? असा प्रश्न ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या भाजप नेत्यांनी विचारला आहे. त्यामुळे या प्रवेशानंतर संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.(Political Exchange in Sambhajinagar) या पक्षांतराचा सर्वाधिक फटका मंत्री अतुल सावे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना बसण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. एका नगरसेवकांना मागील विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. भाजपच्या 6 पेक्षा अधिक नगरसेवकांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Bjp 6 corporator to join UBT Group) पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुका पार पडत आहे. अशात हा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का समजला जातोय. विशेष म्हणजे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. (Former Mayor from sambhajinagar to left Bjp) त्यामुळे ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते पुन्हा पश्चिम विधानसभेतून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर राजू शिंदेंचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. (Former Mayor Raju Shinde to contest vidhansabha From Sambhajinagar)

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपने मोठी मेहनत केली. त्यामुळे संदिपान भुमरे यांच्या विजयात भाजपचा मोठा वाटा आहे. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारले जात नाही.(No one Ask worker in bjp) एवढेच काय तर विजयानंतर आभार देखील मानण्यात आले नसल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.(Bjp Workers to left Bjp) त्यामुळे आम्ही किती दिवस काम करायचं? असं म्हणत भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचा देखील भाजपचे नगरसेवक सांगतायात.

Latest Posts

Don't Miss