Saturday, January 11, 2025

Latest Posts

चंद्रपुरात ‘गाव चलो, बुथ चलो’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकसभा समन्वयक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी साधला जनतेशी संवाद

| TOR News Network | | Great Response to ‘Gaon Chalo, Booth Chalo’ Campaign in Chandrapur | चंद्रपूर. भारतीय जनता पार्टीच्या ‘गाव चलो, बुथ चलो’ अभियानाला चंद्रपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभियानादरम्यान मंगळवारी (ता.१३) चंद्रपूर लोकसभा समन्वयक तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी विविध क्षेत्राशी निगडीत नागरिकांशी संवाद साधला.

या अभियानादरम्यान भाजपा चंद्रपूर महानगर अध्यक्ष राहुल पावडे, निवडणूक प्रमुख प्रमोद कडू, अभियानाचे संयोजक रामपाल सिंह, सहसंयोजिका किरण बुटले, माजी नगरसेविका सविता कांबळे, मंडळ अध्यक्ष बाबुपेठ संदीप आगलावे, सिव्हिल मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोटपल्लीवार, कविता जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्येकर्ते व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

‘गाव चलो, बुथ चलो’ अभियानाच्या अंतर्गत लोकसभा समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बचत गटाचे लाभार्थी महिला, पुरूष, योगा समिती, नवमतदार व विद्यार्थी, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, रमाई घरकूल योजना यासह अन्य योजनांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातील नागरिक, बुथ समिती यांचेशी देखील चर्चा केली. देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात १० वर्षात देशात अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू झाल्या. या योजनांचा लाभ मिळाल्याने नागरिकांच्या जीवनात सुगमता आली. या अशा कल्याणकारी योजनांचा लाभ घेउन जीवनात आलेले बदल या अभियानात नागरिकांनी कथन केले.

महाराष्ट्र राज्य सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केलेली विकासकार्य आणि राबविलेले विकासात्मक धोरण तसेच चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी खासदार श्री. हंसराज भैय्या अहिर यांनी केलेली जनहिताची कार्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे यांनी केलेल्या सूचनेनुसार सर्वसामान्य जनतेसमक्ष पोचते करण्याचे आवाहन ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले.

ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी अभियानाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीवर भर दिला. त्यांनी विद्यार्थी, नवमतदार यांच्याशी संवाद साधून त्यांना लोकशाहीमध्ये मताचे महत्व पटवून दिले. आपल्या एक मताने देशात काय परिवर्तन होउ शकते यासंदर्भात मोदी सरकारच्या कार्यकाळातील महत्वाकांक्षी योजनांचे उदाहरण देउन पटवून दिले. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना यासारख्या योजना महिला, गरीब, गरजूंच्या जीवनात किती महत्वाच्या ठरल्या आहेत, हे देखील पटवून दिले. बचत गटांशी चर्चा करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली व त्यांच्या समस्यांचे देखील निराकरण केले.

Latest Posts

Don't Miss