| TOR News Network | Eknath Shinde On Jayant Patil : अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (Actor govinda join shinde shivsena) या पक्षप्रवेशावरुन जयंत पाटलांनी टोला लगावला होता.ते म्हणालेत गोविंदा आता चालत नाही. त्यामुळं चालणारा कलाकार तरी घ्यायचा अशा शब्दांत जयंत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे. (CM Eknath Shinde reply to Jayant Patil statement)
गोविंदा यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जयंत पाटलांनी काय म्हटलं हे सांगितलं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पाटलांपेक्षा गोविंदा हे चांगले कलाकार आहेत ना? असं शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान, गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशामागं लोकसभेची गणितं असल्याची चर्चा सुरु आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून गोविंदाला लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. (Govinda can contest lok sabha) यापूर्वी गोविंदा २००४ ते २००९ या काळात काँग्रेसमधून खासदार बनले होते. त्यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली. पण आता पुन्हा गोविंदाची राजकारणाची दुसरी टर्म सुरु झाली आहे.(Govinda second term in politics)
२०१० पासून २०१४ पर्यंत या १४ वर्षांच्या वनवासानंतर जिथं आहे तिथेच त्याच पक्षात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश करतो आहे. (Govinda officially join shivsena) पक्षात आल्यानंतर मी इमानदारीत जबाबदारी पार पाडेन हे मी सर्वांना अश्वस्थ करतो, असं पक्ष प्रवेशावेळी गोविंदा यांनी म्हटलं आहे.