Saturday, January 11, 2025

Latest Posts

गिरीश महाजन चांगलेच संतापले…तर पक्षातून हकालपट्टी करू

| TOR News Network |

Girish Mahajan Latest News : लोकसभेत झालेली पीछेहाट भाजपच्या जिव्हारी लागली आहे. केंद्रासह राज्यात सत्ता स्थानी असतानाही जनादेश मिळाला नाही. कुठे कमी पडलो, जनता जर्नादनाचा आशीर्वाद का मिळाला नाही, याविषयीची समीक्षा सुरु आहे. (Bjp Review on Defeat) भाजपचे काही आमदार अजित पवार गटावर नाराज असल्याचे समोर आले आहे.(Bjp Mla Restless Due to Ajit Pawar) तर अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या मतदार संघात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे.(Bjp Leaders slams Party Worker)

लोकसभा निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य न मिळाल्याने त्याची समीक्षा करण्यात आली. (Bjp Review On Loksabha Election) जळगावमध्ये भाजपच्या कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची शाळा भरवली. जळगावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी बंदद्वार घेतलेल्या बैठकीत खडे बोल सुनावले. (Girish Mahajan On Bjp Defeat) जळगाव लोकसभेतील उमेदवारांना पाहिजे तसं मताधिक्य न मिळाल्याने मंत्री गिरीश महाजन यांची पदाधिकारी कार्यकर्त्यांवर नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

जळगाव लोकसभेच्या स्मिता वाघ यांना एकूण 3 ते साडे तीन लाख एवढे मताधिक्य मिळेल अशी मंत्री गिरीश महाजन यांची अपेक्षा होती.जळगाव शहरातूनही त्या त्या बुथवर पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य मिळाले नाही. काही भागात हक्काचा मतदार होता, तिथे पण मतांचा टक्का न वाढल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.(Girish Mahajan Slams BJP corporator)

मताधिक्यामध्ये आणखी वाढ झाली असती मात्र अनेकांनी मनापासून काम न केल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली. जळगाव शहरातील जी एम. फाउंडेशन या संपर्क कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी तब्बल एक तास बंद दारा आड बैठक घेतली.(Mahajan Close door meeting) यामध्ये त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने चूक पुन्हा केल्यास पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी या बंद द्वार बैठकीत पदाधिकाऱ्यांना इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Girish Mahajan Warns Party Worker)

Latest Posts

Don't Miss