Sunday, November 17, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरे आता सामान्य माणूस ते व्हीआयपी राहिलेले नाहीत

अयोध्येतील निमंत्रणावरून गिरीश महाजनांचा खोचक टोला

Girish Mahajan Statement On Uddhav Thackeray : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठीच्या निमंत्रणावर राज्यात आता राजकारण तापले आहे.अशात आता राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी फक्त व्हीआयपी लोकांनाच निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आता व्हीआयपी राहिलेच नाहीत. (Minister Girish Mahajan Says Uddhav Thackray is now not a vip person) ते आता सामान्य माणूस आहेत जणू आसाच टोला गिरीष महाजन यांनी लगावला आहे.

पुढील महिन्यात २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र, या सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकीय नेते एकमेकांवर टीकांचा भडीमार करीत आहेत. उद्धव ठाकरे यांना उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण न दिल्यावरून खासदार संजय राऊत  यांनी भाजपवर सडकून टीका केली होती.

या टीकेचा गिरीष महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बाबरी पाडण्याचा कार्यक्रम हा कारसेवकांचा होता आणि कारसेवक कोण होते हे सर्वांना माहिती आहे. आम्ही २० दिवस कारसेवेत होतो, आम्हाला अटक झाली होती. आमच्याकडे पुरावे आहेत, असं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांच्या डोक्याची किती किव येते. या माणसाचं काय करावं, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. डायरिया झाल्यासारखे संजय राऊत सकाळपासून ओकतच राहतात. लोकांची करमणूक होते, मात्र लोकही त्या करमणुकीला कंटाळले आहेत. असं पात्र महाराष्ट्रात झालेलं कोणीही पाहिलेलं नाही, असा टोलाही महाजन यांनी लगावला.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी फक्त व्हीआयपी लोकांनाच निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता कोणत्याही पक्षाचे अध्यक्ष नाही. त्यांच्याकडे ८ आमदार आणि ३-४ खासदारही नाही. त्यामुळे ते व्हीआयपी राहिलेच नाहीत, त्यांनी स्वत:बद्दल असलेला गैरसमज कमी करावा, असा खोचक सल्लाही गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

Latest Posts

Don't Miss