Sunday, January 12, 2025

Latest Posts

वीमा कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

| TOR News Network |

Insurance Employees Protest In Nagpur : सार्वजनिक क्षेत्रातील साधारण वीमा कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी संघटनांच्या जॉइंट फोरम ऑफ ट्रेड युनियन अँड असोसिएशन (जे एफ टी यु) च्या निर्देशांनुसार आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी  साधारण वीमा कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट २०२२ पासून देय वेतन करारावर  त्वरित वाटाघाटी सुरू कराव्यात, पारिवारिक (फॅमिली) पेन्शन मध्ये  सुधार करुन ती ३०% केली जावी, नॅशनल पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून सर्वांना जुन्या पेन्शन योजनेचे सदस्य करून घ्यावे, आणि तोवर  एनपीएस मध्ये प्रबंधनचे योगदान १४% केले जावे,  साधारण वीमा कंपन्यांचे विलीलिकरण करून कंपन्यांना मजबूती प्रदान केली जावी आणि आवश्यकते नुसार कर्मचाऱ्यांची भरती केली जावी  या प्रमुख मागण्यांसाठी प्रादेशिक कार्यालय असलेल्या केंद्रांवर धरणे आंदोलन केले तसेच अन्यत्र भोजन अवकाश दरम्यान निदर्शने केली. (Protest By General Insurance Employees In Nagpur)

नागपूर येथे साधारण वीमा कर्मचाऱ्यांनी  युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या शंकर नगर स्थित प्रादेशिक कार्यालया समोर धरणे आंदोलन  केले.  धरण्यावर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आणि मागण्या मान्य करण्यासाठी  टाळाटाळ करणाऱ्या सरकार आणि जनरल इन्सुरर्स (पब्लिक सेक्टर) असोसिएशन ऑफ इंडीया, जीप्सा,  विरोधात घोषणा दिल्या.

ऑगस्ट २०२२ पासून देय कर्मचाऱ्यांचे वेतन पूनारनिर्धारण यावर प्राथमिक चर्चा सुद्धा केल्या गेली नाही. तिकडे बँक कर्मचाऱ्यांना १७% वाढ देण्यात आली असून जीवन विमा कर्मचाऱ्यांना १४% वाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. जिप्सा द्वारा पाठविलेल्या ३०% पेन्शन च्या प्रस्ताव अजूनही डिपार्टमेंट ऑफ फायनांशियल सर्व्हिसेस कडे पडून आहे. नव्या पेन्शन योजनेत किमान पेन्शन ची कुठलीही तरतूद नाही, त्यामुळे  सर्वांना १९९५ च्या पेन्शन योजनेची सदस्यता द्यावी आणि तोवर प्रबांधनाने NPS मधील त्यांचे योगदान १४% पर्यंत वाढवावे अशी मागणी कर्मचारी करीत आहे.

सरकारच्या सार्वजनिक क्षेत्र विरोधी तसेच कर्मचारी विरोधी धोरणांमुळे  आणि अनावश्यक हस्तक्षेपामुळे  खाजगी विमा कंपन्यांचे फावते आहे. चारही सरकारी विमा कंपन्या खाजगी विमा कंपन्यांसोबतच आपसात ही स्पर्धा करतात. ज्याचा लाभ खाजगी कंपन्यांना होतो आहे  सरकारी विमा कंपन्यांना मजबूत बनविण्यासाठी त्यांचे विलीनीकरण हाच एकमात्र उपाय आहे.  सरकारी साधारण विमा कंपन्यांच्या अनेक कार्यालयात कर्मचारी अधिकारी यांचा तुटवडा आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवा देताना कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडतो, म्हणून या कंपन्यांत कर्मचारी, अधिकारी यांची भरती केली जावी अशी मागणी कर्मचारी करीत आहेत.  या धरणे आंदोलनात मोठया संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. जे एफ टी यु ने २८ फरवरी रोजी भोजन पूर्व १ तास बहीर्गमन संप करण्याचे ठरविले आहे.

धरणे आंदोलन समाप्तीच्या वेळी आयोजित निदर्शनाला सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी  मोठ्या संख्येनी उपस्थिती दर्शवली. निदर्शनां नंतर आयोजित द्वार सभेला राजेंद्र सरोज, अरुण कुलकर्णी, विनोद साखरे, अनिल साखरकर,  सुरेंद्र कांबळे यांनी संबोधित केले.धरणे,निदर्शने आणि द्वरसभेला यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत देशपांडे, प्रशांत दीक्षित, विनय करपे, दीपक गोतमारे, अनिल नीमजे, स्वप्नील कोहळे, ओंकार शेंडे, होमराज आदे, सुनील तांबे, रवींद्र बुलबुले, रोहित शिवहरे यांनी प्रयास केलेत.

Latest Posts

Don't Miss