सिलव्हर ओकवर झाली बंद दाराआड चर्चा
Gautam Adani Meets Sharad Pawar : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.गौतम अदानी स्वत: शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक निवासस्थानी गेले होते. (Sharad Pawar Gautam Adani Meeting on Silver oak) शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड काहीवेळ चर्चा झाली. गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट का घेतली? या भेटीमागे काय कारण आहे? असा प्रश्न आता अनेकांना सतावत आहे.
गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीमागे विविध अर्थ लावले जात आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थिती बघता गौतम अदानी हे भाजपाच्या जवळचे मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गौतम अदानी यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात सुद्धा जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अदानी यांनी पहिल्यांदा शरद पवार यांची भेट घेतलेली नाही. यापूर्वी सुद्धा गौतम अदानी यांनी शरद पवार आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सध्या देशात एअरपोर्ट बंदरापासून वेगवेगळ्या क्षेत्रात अदानी समूह वेगाने विस्तारत आहे. गौतम अदानी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेकदा निशाणा साधला आहे. सध्या इंडियात आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. अशावेळी अदानी आणि पवारांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.अदानी समूह धारावीचा पूनर्विकास करणार आहे. त्या विरोधात अलीकडेच ठाकरे गटाने मोठा मोर्चा काढला होता.अदानी आणि शरद पवार भेटीमागे हे एक कारण असल्याची शक्यता असल्याचे बोल्ले जात आहे.