Thursday, January 16, 2025

Latest Posts

विधानसभेत गणपतराव देशमुख यांचा नातू थेट शहाजी पाटलांशी भिडणार

| TOR News Network |

Sangola Assembly constituency Latest News : महाराष्ट्र विधानसभेच्या राजकारणात 50 वर्षे आमदारकीची कारकीर्द गाजवणारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख यांची पुढील पिढी आता राजकारणात पाऊल ठेवत आहे. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. (Ganpatrao Deshmukh;s Grandson to contest Vidhansabha Election)ते थेट विद्यमान आमदार शहाजी बाप्पू पाटील यांना आव्हाण देणार आहेत. (Dr. Babasaheb Deshmukh to Challenge MLA Shaji bappu Patil) त्यांनी महुद गावात शक्तिप्रदर्शन करत विधानसभेसाठी आपण सज्ज असल्याचे संकेत दिलेत.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांनी विधानसभा लढवली होती. मात्र त्यावेळी अनिकेत यांचा निसटता पराभव झाला.(Aniket Deshmukh Escape Defeat) यानंतर आता गणपतराव देशमुख यांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या  (शेकाप) वतीने बाबासाहेब देशमुख यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी सांगोला विधानसभा मतदारसंघात केली आहे.

एक पक्ष, एक विचार येऊन पन्नास वर्षे राजकारण करणारे गणपतराव देशमुख हे महाराष्ट्रातील एक आदर्श राजकीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पाश्चात त्यांची मुले अथवा मुली कुणीही राजकारणात सक्रिय झाले नाहीत. मात्र आता आजोबांचा वारसा सांगत राजकारणात गणपतरावांचे नातू पुढे आले आहेत. नुकतीच गणपतरावांचे नातू बाबासाहेब यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना सोबत घेऊन मोठी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले.( Dhairyasheel Mohite Patil,Rally With Babasaheb Deshmukh) यानिमित्ताने राज्यातील सेलिब्रेटी आमदार अशी ओळख असणाऱ्या आमदार शहाजीबापू पाटील यांना थेट आव्हान बाबासाहेब देशमुख यांनी दिले आहे.(Babasaheb Deshmukh Vs Shaji Patil) त्यामुळे सांगोला मतदारसंघात परंपरागत असणारा पाटील आणि देशमुख यांचा सामना यंदाही विधानसभेला पहायला मिळेल.

सांगोला विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने धनगर समाज आणि मराठा समाजाच्या मताधिक्याचे राजकारण चालते. धनगर समाज आणि शेकाप पक्षाला मानणारा वर्ग आजपर्यंत गणपतराव देशमुख यांच्या मागे ठामपणे उभा होता. हाच वर्ग गणपतरावांच्या पश्चात आता दुसऱ्या नातवासाठी कुठली भूमिका घेणार? हे मात्र विधानसभेच्या धामधुमी नंतरच समजेल.

Latest Posts

Don't Miss