खासदार संजय राऊत यांची उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
| TOR News Network | Sanjay Raut Allegation On Cm Shinde : सध्या राज्यात वाढलेल्या गन्हेगारीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. त्यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच पुण्यातही ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावरुन संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरत टीका केली. (Sanjay Raut Slams Maharashtra Sarkar)
महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला आहे.
“महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था हा अत्यंत चिंतेचा विषय आहे.(Maharashtra law and order are in danger) शिवसेनेचा नगरसेवक आणि एक प्रमुख पदाधिकारी याची हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिल्लू आहे का? अशा शब्दात संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Sanjay Raut Slams DCM Devendra Fadanvis) यांच्या प्रतिक्रियेवरुन संताप व्यक्त केला. बिहार हा खूप बरा आहे, महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला आहे. गुंडगिरी, झुंडगिरी, माफियामध्ये महाराष्ट्र पुढे गेला…” असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच
“ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे या राज्यात निर्भयपणे या माध्यमातून एक ठिकाणी सभा घेत आहेत, त्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या तीन लोकांवर निर्घृण हल्ला झाला, ठार मारण्याचे प्रयत्न करण्यात आला याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच,” अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला.
गुंडांनी गुंडा साठी चालविलेले राज्य
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एका गुंडासोबतचा फोटो ट्वीट करतही जोरदार टीका केली आहे. “गृहमंत्री देवेंद्र जी, यालाच म्हणतात गुंडांनी गुंडा साठी चालविलेले राज्य! नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे.(Gangster Photo With Cm Shinde) तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत, हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच,” असे संजय राऊत म्हणालेत.