Monday, January 13, 2025

Latest Posts

हत्येच्या भीतीमुळे गँगस्टर अबू सलेमला अज्ञातस्थळी हलवलं

| TOR News Network |

Abu Salem Latest News : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गँगस्टर अबू सालेमला तळोजा कारागृहातून कमालीची गोपनीयता पाळत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आलं होतं. त्याला या कारागृहातील अंडासेलमध्ये महिनाभर ठेवण्यात आलं. मात्र काल रात्री ब्लॅक कमांडोसह मोठ्या पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून दुसरीकडं हलवण्यात आलं आहे.(Abu Salem Transferred  From Nashik Jail ) कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला कोणत्या कारागृहात हलवण्यात आलं, याबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.(Top Secret About Abu Salem Transfer)

नाशिकरोड कारागृहातील अंडासेलमध्ये कुख्यात गँगस्टर अबू सालेम याचा महिनाभरापासून मुक्काम होता. तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमला नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलं.(Deu to security reason abu salem moved from nashik jail) अबू सालेमला एका महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यासाठीच कडेकोट बंदोबस्तात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून रेल्वेच्या माध्यमातून एका मोठ्या शहरात हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी जेलरोड परिसरासह नाशिक रोड रेल्वे स्टेशनला छावणीचं स्वरुप आलं.

कुख्यात गँगस्टर अबू सालेमच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्याला कुठल्या शहरात नेलं याचा मात्र खुलासा अद्याप करण्यात आला नाही. (Abu Salem Transfered from nashik jail) अबू सालेमला त्याची हत्या केली जाईल, अशी भीती आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आलं, अशी चर्चा आहे. ज्या रेल्वेतून अबू सालेमला नेण्यात आलं, त्या रेल्वेच्या विशेष बोगीची श्वान पथकाकडून तपासणीदेखील करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Latest Posts

Don't Miss